लोर्ड्स, 15 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये इंग्लंड आणि न्यूजीलंड यांच्यात रोमांचक अंतिम सामना झाला. ICC Cricket World Cupमध्ये इंग्लंड आणि न्यूजीलंड यांच्यात रोमांचक अंतिम सामना झाला. हा रोमांच एवढा होता की सामना टाय होऊन सुपरओव्हर पर्यंत गेला, त्यानंतर ही सुपर ओव्हरही टाय झाली. त्यामुळे यजमान इंग्लंड यांना सामान्यात सर्वात जास्त चौकार लगावल्यामुळे चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळाला. दरम्यान वर्ल्ड कपच्या इतिहासात चारवेळा अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेल्या इंग्लंडने पहिल्यांदाच वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले.
मात्र, सामन्यानंतर दिग्गजांनी आणि चाहत्यांनी आयसीसीच्या या नियमावर नाराजी व्यक्त केली. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं, "मला कळत नाही आहे की, अशा सामन्यांमध्ये चौकार कसे काय ठरवू शकतो की कोण विजेता होणार. हा सामना टायचा राहिला पाहिजे होता. मी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांचे अभिनंदन करतो, माझ्या लेखी दोन्ही संघ विजयी आहेत".
तर, न्यूझीलंडचा माजी ऑलराऊंडर स्कॉट स्टायरिसनं, "खुप छान आयसीसी तुम्ही म्हणजे मस्करी करता", असे ट्वीट केले.
ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज ब्रेट ली यानंसुद्धा आयसीसीच्या या नियमाचा विरोध केला.
Congratulations to England!
Commiserations New Zealand.
I’ve got to say that it’s a horrible way to decide the winner. This rule has to change.
— Brett Lee (@BrettLee_58) July 14, 2019
तर, भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रानं, पहिल्यादाच चौकांरामुळं कोणता तरी संघ जिंकला आहे. न्यूझीलंडनं सामना जिंकला नसला तरी, त्यांनी सर्वांच मनं जिंकली आहेत.
त्यानंतर चाहत्यांनीसुध्दा आयसीसीच्या या नियमाचा विरोध करत, निराशा व्यक्त केली.
दरम्यान, न्यूजीलंडचा संघ विजयाच्या जास्त जवळ होता. न्यूजीलंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे न्यूजीलंडने 8 विकेट गमावत 241पर्यंत मजल मारली. दरम्यान या आव्हानाचा पाठलाग करताना बेन स्टोकने 84 धावांची वादळी खेळी केली. बेनच्या खेळीच्या जोरावर शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडला 15 धावांची गरज असताना यजमानांना केवळ 14 धावा करता आल्या. यात गुप्टीलनं केलेला ओव्हरथ्रो न्यूजीलंडला महागात पडला. दरम्यान त्यानंतर झालेल्या सुपरओव्हरमध्येही दोन्ही संघांनी 15 धावा केल्या. मात्र इंग्लंडला सर्वात जास्त चौकार लगवल्यामुळे चॅम्पियन होण्याचा बहुमान त्यांना मिळाला.
सुपर ओव्हरचा नियम
-शेवटी फलंदाजी करणारा संघ पहिल्यांदा फलंदाजी करतो.
-क्षेत्ररक्षण करणारा संघ कोणत्या दिशेने गोलंदाजी करणारा.
-तसेच, सुपर ओव्हरच्या खेळीत 2 विकेट गेल्यास खेळ त्या संघाचा खेळ समाप्त होतो.
-सुपर ओव्हरमध्ये सामना टाय झाल्यास जास्त चौकार लगावणारा संघ सामना जिंकतो.
वाचा- सचिनच भारी; या World Cupमध्येही मोडता आला नाही मास्टर ब्लास्टरचा विश्वविक्रम!
वाचा- World Cup : जग्गजेता ठरवणारी सुपर ओव्हर, पाहा VIDEO
वाचा- World Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान!
दोन बैलांच्या धडकेच 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, थरकाप उडवणारा CCTV