World Cup : धोनीच्या रन आऊटवर ढसाढसा रडला फोटोग्राफर? जाणून घ्या काय आहे सत्य

धोनीच्या रनआऊटनंतर व्हायरल झालेला फोटो हा आशियाई फुटबॉल कपमधला असल्याचे आता समोर आले आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 04:06 PM IST

World Cup : धोनीच्या रन आऊटवर ढसाढसा रडला फोटोग्राफर? जाणून घ्या काय आहे सत्य

लंडन, 12 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडनं भारतीय संघाला 18 धावांनी पराभूत केले. या सामन्यात धोनी आणि जडेजा यांनी शतकी भागिदारी केली. मात्र धोनीच्या एका रनआऊटनं सामना पलटला आणि भारतानं सामना गमावला. यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. यात एक फोटो सोशल मीडियावर कोट्यवधी चाहत्यांनी शेअर केला, तो म्हणजे धोनीच्या रन आऊटनंतर एका फोटोग्राफरच्या रडतानाचा. हा फोटो न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात काढण्यात आला आहे, अशा आशयाने फोटो व्हायरल करण्यात आला होता.

मात्र, हा व्हायरल फोटो न्यूझीलंड-भारत सामन्या दरम्यान काढण्यात आला नसल्याचे आता समोर आले आहे. या फोटोंमध्ये दिसणारा फोटोग्राफरचे नाव अल-अजावी असे आहे. हा फोटोग्राफर इराकचा नागरिक आहे. दरम्यान, त्याचा ढसाढसा रडतानाचा व्हायरल झालेला फोटो हा जानेवारीत कतारमध्ये झालेल्या आशियाई फुटबॉल सामन्यातला आहे. दरम्यान ट्रोल फुटबॉल या वृत्तासंस्थेने हा फोटो 24 जानेवारी रोजी व्हायरल केला होता.

Loading...

आशियाई स्पर्धेत इराकचा संघ बाहेर गेल्यानंतर हा फोटोग्राफर ढसाढसा रडला होता. मात्र त्याचा हाच फोटो धोनीच्या रनआऊटनंतर पुन्हा व्हायरल झाला होता. मात्र हा फोटो जानेवारीचा असल्याचे समोर आले आहे.

वाचा- रवी शास्त्रींनी सांगितले पराभवाचे खरं कारण, धोनीबाबत म्हणाले...

वाचा- 'चौथ्या क्रमांकावर 'हा' मुंबईकर खेळाडूच होता योग्य, निवड समितीचा निर्णय चुकला'!

वाचा- मयंक अग्रवाल इंग्लंडला पोहचलाच कसा? निवड समितीवर भडकले गावस्कर

VIDEO: जगबुडीचं रौद्र रूप! मुसळधार पावसामुळे नदीनं ओलांडली धोक्याची पातळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...