World Cup : अल्लाहमुळेच जिंकलो वर्ल्ड कप, मैदान गाजवल्यानंतर इंग्लंडच्या कर्णधाराची प्रतिक्रिया

World Cup : अल्लाहमुळेच जिंकलो वर्ल्ड कप, मैदान गाजवल्यानंतर इंग्लंडच्या कर्णधाराची प्रतिक्रिया

इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याचा सामन्यानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Share this:

लंडन, 15 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांचक अंतिम सामना झाला. हा रोमांच एवढा होता की सामना टाय होऊन सुपरओव्हर पर्यंत गेला, त्यानंतर ही सुपर ओव्हरही टाय झाली. त्यामुळे यजमान इंग्लंड यांना सामन्यात सर्वात जास्त चौकार लगावल्यामुळे चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळाला. विजेतेपद मिळवल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार यांने संघाच्या विजयाचे कारण सांगितले.

अंतिम सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मॉर्गनला, "आर्यलॅंडचा आहेस, त्यामुळं त्याच्या प्रेमानं तु सामना जिंकलास का"?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मॉर्गननं, "मी रशिद आदिलशी सामना सुरु असताना बोललो. तेव्हा त्यानं अल्लाह आपल्या सोबत आहे. काहीही काळजी करू नका", असे सांगितले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकीकडे धर्मावर राजकारण होत असताना इंग्लंडच्या कर्णधारानं केलेल्या या वक्तव्याचे सर्वांनी स्वागत केले आहे.

वाचा- रोहितनं पुन्हा घेतला ICCशी पंगा, वर्ल्ड कप फायनलबाबत म्हणाला...

पहिल्यांदाच इंग्लंड बनला चॅम्पियन

न्यूझीलंडचा संघ विजयाच्या जास्त जवळ होता. न्यूझीलंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे न्यूजीलंडने 8 विकेट गमावत 241पर्यंत मजल मारली. दरम्यान या आव्हानाचा पाठलाग करताना बेन स्टोकने 84 धावांची वादळी खेळी केली. बेनच्या खेळीच्या जोरावर शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडला 15 धावांची गरज असताना यजमानांना केवळ 14 धावा करता आल्या. यात गुप्टीलनं केलेला ओव्हरथ्रो न्यूझीलंडला महागात पडला. दरम्यान त्यानंतर झालेल्या सुपरओव्हरमध्येही दोन्ही संघांनी 15 धावा केल्या. मात्र इंग्लंडला सर्वात जास्त चौकार लगवल्यामुळे चॅम्पियन होण्याचा बहुमान त्यांना मिळाला.

वाचा- इंग्लंडनं पहिल्यांदाच जिंकला वर्ल्ड कप, तरी ICCने दिली नाही खरी ट्रॉफी

वाचा- World Cup : न्यूझीलंडनेच जिंकलाय वर्ल्ड कप! वाचा ICCचा नियम क्रमांक 19.8

इंग्लंडचा विजय ते चांद्रयान-2चं प्रक्षेपण रद्द, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

First published: July 15, 2019, 3:48 PM IST

ताज्या बातम्या