लॉर्ड्स, 26 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत इंग्लंडला सातपैकी तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या विजयाने इंग्लंडची पुढची वाट बिकट झाली आहे. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 286 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 221 धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडकडून बेन स्टोक्स वगळता एकाही फलंदाजाला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर टिकता आलं नाही. सलामीवीर जेम्स विन्सला बेहरनडॉर्फनं बाद केलं. त्यानंतर स्टार्कने जो रूट आणि इयॉन मॉर्गनला बाद करून आघाडीची फळी तंबूत धाडली. त्यानंत बेहरनडॉर्फने बेअरस्टोला बाद करून मोठा अडथळा दूर केला. बेन स्टोक्स आणि जोस बटलरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण बटलरला बाद करून स्टोईनिसने जोडी फोडली.त्यानंतर बेन स्टोक्सला 89 धावांवर स्टार्कने बाद केलं. नंतर मोईन अली, ख्रिस वोक्स आणि जोफ्रा आर्चरला बाद करून ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. शेवटी ख्रिस वोक्सने पेंट कमिन्सला बाद करून विजयावर शिक्कामोर्तब केलं.
Mitchell Starc being Mitchell Starc. Plus some exceptional Australian fielding.
— ICC (@ICC) June 25, 2019
See how England lost their wickets 👇🏼#CmonAussie #CWC19 pic.twitter.com/4Bq9UFaT0T
तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीला पाचारण केलं. ऑस्ट्रेलियाने फिंचच्या शतकाच्या आणि वॉर्नरच्या अर्धशतकाच्या जोरावर 50 षटकांत 285 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अॅरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी 123 धावांची भागिदारी केली. वॉर्नरला बाद करून मोईन अलीने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. वॉर्नर 53 धावांवर बाद झाला. त्यानंतर फिंचने ख्वाजासोबत अर्धशतकी भागिदारी केली. ख्वाजाला स्टोक्सने 23 धावांवर बाद केलं.
World Cup : सचिनची भविष्यवाणी ठरली खरी, इंग्लंडला आधीच केलं होतं सावध पण...
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने 116 चेंडूत 100 धावा केल्या. त्यानंतर लगेच शतक साजरं करणाऱ्या फिंचला जोफ्रा आर्चरने ख्रिस वोक्सकडं झेल देण्यास भाग पाडलं. त्यानंतर ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक 2 गडी बाद केले. तर आर्चर, वूड, स्टोक्स, मोईन अली यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
A run-out with both batsmen at the same end? There was one in Australia's innings today
— ICC (@ICC) June 25, 2019
See all of Australia's wickets ⬇#ENGvAUS #CWC19 pic.twitter.com/qDV6d0Jmm7
इंग्लंड सहज सेमिफायनल गाठेल असं चित्र स्पर्धेतील निम्मे सामने होईपर्यंत होतं. मात्र, साखळी फेरीतील शेवटच्या टप्प्यात बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानने मिळवलेला विजय आणि इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव यामुळे त्यांना पुढची वाटचाल कठीण होणार असंच दिसत आहे. इंग्लंडचे उर्वरित दोन सामने न्यूझीलंड आणि भारतासोबत होणार आहेत. यात त्यांना विजय मिळवणं मोठं आव्हान असणार आहे. जर सेमिफायनल गाठायची असेल तर दोन्ही बलाढ्य संघांना पराभूत करणं गरजेचं आहे.
World Cup : इंग्लंडच्या अडचणीत वाढ, स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की?
बेस्टला अच्छे दिन येणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या