World Cup : पाकच्या वियजाने वाढली यजमानांची धाकधुक, स्पर्धेतून होणार बाहेर?

World Cup : पाकच्या वियजाने वाढली यजमानांची धाकधुक, स्पर्धेतून होणार बाहेर?

इंग्लंडला सेमीफायनल गाठायची असेल तर त्यांना 27 वर्षांतील इतिहास बदलावा लागेल.

  • Share this:

लंडन, 24 जून : ICC Cricket World Cupमध्ये पाकिस्तानने भारताविरुद्धच्या पराभवातून सावरत जोरदार कमबॅक केलं आहे. लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानना 50 षटकांत 308 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 259 धावांत रोखलं. या विजयानंतर पाकिस्तानच्या सेमीफायनलला पोहचण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पाकिस्तानच्या विजयाने यजमान इंग्लंडच्या पुढच्या वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून पाकचे 6 सामन्यात 5 गुण झाले आहेत. जर पाकिस्तानने पुढचे तीनही सामने जिंकले तर त्यांना सेमिफायनलला जागा मिळू शकते. पाकिस्तानने उर्वरित सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचे 11 गुण होतील. पाकिस्तानच्या वर लंकेचा संघ असून ते एका सामन्यात जरी पराभूत झाले आणि इतर सामन्यात विजय मिळवला तर त्यांचे 10 गुण होतील. तर बांगलादेशसुद्धा एका सामन्यात पराभतू झाल्यास त्यांनाही 10 गुण मिळवता येतील. या दोन्ही संघांना भारताशी लढायचे आहे. त्यात विजय मिळवणं लंकेला आणि बांगलादेशला कठीण आहे. बांगलादेश आणि लंकेच्या पराभवाशिवाय यजमान इंग्लंडच्या जय पराजयावर पाकिस्तानची पुढची वाटचाल ठरणार आहे.

इंग्लंडच्या वाटेत इतिहासाचा अडथळा

इंग्लडचे आता तीन सामने राहिले आहेत. त्यात त्यांचा सामना ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड यांच्याशी होणार आहे. यामुळे त्यांच्यावर वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचण्याचं मोठं आव्हान असणार आहे. इंग्लंडची तीन सामन्यात अशा संघांसोबत गाठ पडणार आहे जे सध्या टॉप 4 मध्ये आहेत. इंग्लंडचा वर्ल्ड कपमधील 27 वर्षातील इतिहास बघितला तर त्यांना यावेळी सेमीफायनल गाठणं कठीण आहे. 1992 पासून त्यांना ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड यांच्याविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. या तीन संघाविरुद्ध त्यांना 10 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

वाचा-वर्ल्ड कपमध्ये पाक संघ सर्वात ढिसाळ, टीम इंडिया जगात भारी !

वाचा-World Cup : भारत-पाक, कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा भिडणार?

वाचा- World Cup : भारतच होणार जग्गजेता, हा घ्या पुरावा!

VIDEO : 'आता माझी सटकली', बैलाने व्यापाऱ्याला लाथ मारून 8 फूट लांब फेकलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 03:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading