IND vs ENG : चहलचा कहर, मोडला 16 वर्षांपूर्वीचा नकोसा रेकॉर्ड

IND vs ENG : चहलचा कहर, मोडला 16 वर्षांपूर्वीचा नकोसा रेकॉर्ड

इंग्लंडनं भारताला 338 धावांचे आव्हान दिले आहे.

  • Share this:

बर्मिंगहॅम, 30 जून: ICC Cricket World Cupमध्ये सध्या विराटसेननं एकही सामना गमावलेला नाही. आज इंग्लंड विरोधात होणाऱ्या सामन्यात भारताला 338 धावांचे आव्हान पार करावे लागणार आहे. बेअरस्टो आणि जेसॉन रॉय यांची शतकी भागिदारी त्यानंतर बेअरस्टोचे शतक आणि स्टोक्सची आक्रमक खेळी या सगळ्याच्या जोरावर इंग्लंडनं 337 धावांपर्यंत मजल मारली. गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमीनं इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव टाकला. त्यानं 69 धावा देत 5 विकेट घेतल्या. 5 विकेट घेण्याची कमाल शमीनं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा केली आहे. तसेच, त्याचे हे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच त्यानं 5 विकेट घेतले आहेत.

मात्र, या सामन्यात सगळ्यात जास्त फटका बसला तो भारतीय फिरकीपटूंना. कुलदीप यादवनं चांगली गोलंदाजी केली असली तरी, युजवेंद्र चहलला मात्र इंग्लंडनं टार्गेट केले. इंग्लंडच्या फलंदाजांनी चहलची धुलाई केली. चहलनं आपल्या 10 ओव्हरमध्ये 8.08च्या सरासरीनं 88 धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही. चहलनं वर्ल्ड कपच्या इतिहासातला सर्वात वाईट रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. भारताकडून सर्वात जास्त धावा देण्याच्या यादीत चहल आता पहिल्या क्रमांकावर आला आहे.

चहलच्याआधी भारताचा माजी फलंदाज जवागल श्रीनाथ यांच्या नावावर हा विक्रम होता. 2003च्या वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात श्रीनाथ यांनी 87 धावा दिल्या होत्या. या सामना भारताला गमवावा लागला होता. वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त धावा देण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत करसन घावरी. घावरी यांनी 1975च्या वर्ल्ड कपमध्ये लॉर्डसवर 83 धावा दिल्या होत्या.

आजच्या सामन्यात इंग्लंडनं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना भारताला 338 धावांचे आव्हान दिले. भारतीय गोलंदाजांवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपले वर्चस्व राखले. मात्र, कुलदीप यादवनं भारताला पहिले यश मिळवून दिले. जेसॉन रॉय 66 धावांवर बाद झाला. सलामीला आलेला बेअरस्टो यांन 90 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. त्यामुळं भारतीय गोलंदाजांना बेअरस्टोला बाद करावे लागणार आहे. जेसॉन बाद झाल्यानंतर मैदानात सध्या रूट फलंदाजीसाठी आला आहे. बेअरस्टो 111 धावा करत बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेला इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन यालाही शमीनं माघारी धाडले. मॉर्गन 1 धावा करत बाद झाला. त्यानंतर रूट आणि बेन स्टोक यांनी चौथ्या विकेटसाठी चांगली फलंदाजी केली.

मात्र, शमीनं पुन्हा एकदा इंग्लंडला एक झटका दिला, रूट 44 धावांवर बाद झाला. तर, बटलर 20 धावांवर बाद झाला. शमीनं वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. बेन स्टोकच्या 79 धावांच्या जोरावर इंग्लंडनं 337 धावांपर्यंत मजल मारली.

SPECIAL REPORT : 'दंगल' गर्लची बॉलिवूडमधून एक्झिट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2019 07:17 PM IST

ताज्या बातम्या