England vs South Africa : यजमानांनी केली गोड सुरुवात , साऊथ आफ्रिकेवर 104 धावांनी विजय

दरम्यान इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात ओव्हलवर झालेल्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडनं आपणच प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 10:11 PM IST

England vs South Africa : यजमानांनी केली गोड सुरुवात , साऊथ आफ्रिकेवर 104 धावांनी विजय

लंडन, 30 मे : जगभरातील क्रिकेटप्रेमी ज्या स्पर्धेची गेली पाच वर्ष वाट पाहत होते, त्या विश्वचषक स्पर्धेला आता सुरुवात झाली आहे. दरम्यान इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात ओव्हलवर झालेल्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडनं आपणच प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले. साऊथ आफ्रिकेला 104 धावांनी नमवले. या सामन्यात जोफ्रा आर्चरचा दबदबा दिसून आला. तर, बेन स्टोकनं गोलंदाज आणि फलंदाजीमध्येही कमाल केली.

साऊथ आफ्रिकेनं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 312 धावांचे आव्हान साऊथ आफ्रिकेला दिले. मात्र, या धावसंख्येचा पाठलाग करताना, जोफ्रा आर्चरनं साऊथ आफ्रिकेच्या फलंदाजांची झोप उडाली. जोफ्रानं 27 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर, लियम प्लंकेटनं आणि बेन स्टोकनं2 विकेट घेतल्या. दरम्यान साऊथ आफ्रिकेकडून क्विंटन डिकॉकनं 68 धावांची खेळी केली. त्यामुळं स्कोअर कार्ड काहीसा हलता राहिला. मात्र साऊथ आफ्रिकेला विजय नोंदवता आला नाही.

दरम्यान, इंग्लंकडून प्रथम फलंदाजी करताना चार फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. साऊथ आफ्रिकेच्या संघाला चांगली भागीदारी करता आलेली नाही. रैसी वैन डेर डुंसा याने अर्धशतकी खेळी केली, मात्र विजय मिळवता आली नाही.

यजमानांनी प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या चेंडूतच त्यांना पहिला फटका बसला. जॉन बेअरस्टोक गोल्डन डकचा मानकरी ठरला. इमरान ताहिरनं त्याची विकेट काढली. त्यानंतर जेसन रॉय आणि जॉ रुट यांनी चांगली फलंदाजी केली. यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. यंदाच्या विश्वचषकातली ही पहिली शतकी भागीदारी ठरली आहे.

जेसन रॉय आणि जॉ रुट यांच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं 300चा आकडा पार केला. त्यानंतर फेहलुकवायोनं जेसनला बाद केले. रुट चांगली फलंदाजी करत आहे, असे वाटत असतानाच रबाडानं त्याला बाद केले. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार मॉर्गन आणि बेस स्टोक यांनी चांगली फलंदाजी केली. त्यांनी 106 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मात्र मॉर्गन 60 चेंडूत 57 धावा करत बाद झाला, ताहीरनं त्याची विकेट घेतली. पहिल्याच सामन्यात इंग्लंडच्या चार फलंदाजांनी अर्धशतक केले. याच्या जोरावरच त्यांनी साऊथ आफ्रिकेसमोर धावांचा डोंगर उभा केला. साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पहिल्या काही ओव्हरमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांवर तबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यात सातत्य राखता आले नाही. आफ्रिकेकडून इमरान ताहीर, लुंगी निग्धी आणि रबाडा यांनी 2 तर, फेहलुकवायो यांने एक विकेट घेतली. दरम्यान आता या आव्हानाचा पाठलाग करताना, हाशिम अमला, ड्युप्लेलिस यांच्यावर संघाची मदार असणार आहे.

Loading...

इमरान ताहीरनं रचला इतिहास

विश्वचषकात फिरकी गोलंदाजांन पहिली ओव्हर केली आहे, असे चित्र सहसा दिसत नाही. दरम्यान इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यातील सामन्यात इमरान ताहिरनं आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेत एक इतिहास रचला आहे.

बेअरस्टोच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड

जॉनी बेअरस्टो हा जगातला पहिला सलामीवीर आहे, जो विश्वचषकातील सामन्यात शुन्यावर बाद झाला. तो इंग्लंडचा पहिला सलामीवीर आहे. ज्यानं पहिल्यांदा फलंदाजी करताना शुन्यावर आपली विकेट टाकली. दरम्यान वर्ल्डकपच्या इतिहासात हा प्रसंग दुसऱ्यांदा घडला आहे. 1922मध्ये जॉन राईटनं पहिल्याच ओव्हरमध्ये आपली विकेट गमावली होती.

वाचा- England vs South Africa : IPL गाजवणारा 'हा' खेळाडू ठरला गोल्डन डकचा मानकरी

वाचा- हा कसला वर्ल्ड कप, स्पर्धेतील बदलावर सचिन नाराज

वाचा- आपलंच नाव गुगलवर सर्च करतो हा खेळाडू, जडेजाने केला खुलासा


VIDEO : मोदींच्या शपथविधीला ममता राहणार अनुपस्थित; या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 02:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...