World Cup मध्येही IPLसारखा प्रकार, अम्पायरच्या एका चुकीमुळे वेस्ट इंडिजला गमवावा लागला सामना

पंचांच्या चुकीमुळं गेल एकदा नाही तर तिसऱ्यांदा बाद झाला.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 02:00 PM IST

World Cup मध्येही IPLसारखा प्रकार, अम्पायरच्या एका चुकीमुळे वेस्ट इंडिजला गमवावा लागला सामना

लंडन, 07 जून : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात ICC World Cupमध्ये झालेल्या सामन्यात अनेक वादग्रस्त प्रसंग घडले. या सामन्यात पंचांवर फिक्सिंगचे आरोपही करण्यात आले. या सामन्यात वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरु असताना, पाचव्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर मिशेल स्टार्कनं फॉर्ममध्ये असलेल्या ख्रिस गेलला यॉर्कर चेंडू टाकला जो नो बॉल होता. मात्र, पंच क्रिस गैफनं याकडे दुर्लक्ष करत, दुसऱ्याच चेंडुवर गेलला बाद घोषित केले. जर, पंचांनी तो चेंडू नो बॉल घोषित केला असता, तर पुढचा चेंडू फ्रि हीट असता. पंचांच्या या एका चेंडूमुळं वेस्ट इंडिजनं सामना गमावला.

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कांगारुंनी बाजी मारली. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 289 धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 9 बाद 273 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियानं हा सामना 15 धावांनी जिंकून वर्ल्ड कपमधील दुसऱ्या विजयाची नोंद केली. सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी धावगती चांगली राखली होती. पण शेवटच्या षटकांत स्टार्कने वेस्ट इंडिजच्या तीन फलंदाजांना बाद करून सामना आपल्या बाजूने फिरवला. त्याने 39 व्या षटकात रसेलला आणि ब्रेथवेट, होल्डरला बाद केलं. यामुळे वेस्ट इंडिजच्या विजयाच्या आशा मावळल्या.विंडिजकडून शाय होपनं सर्वाधिक 68 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार होल्डरने 51 तर निकोलस पूरनने 40 धावा केल्या. गेल, रसेल आणि हेटमायर यांना फारशा धावा करता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कने 5 विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा केला.दरम्यान क्रिस गैफ यांच्यावर समालोचकांनीही टीका केली. यावेळी सुनील गावसकर यांनी, तिसऱ्या पंचांनी यात हस्तक्षेप करायला हवा होता, असे मत व्यक्त केले. यामुळं चाहत्यांनी हा World Cup आहे, IPL नाही, अशा शब्दात टीका केली आहे.

क्रिस गैफनं याआधीही केल्या आहेत 2 मोठ्या चुका

क्रिस गैफया पंचांनी नो बॉलबाबत केली चुक वगळता याआधीही मोठ्या चुका केल्या आहेत. मिशेल स्टार्कच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये गेलला घेतलेला झेल त्यांनी आऊट दिला. मात्र रिव्ह्युमध्ये हा निर्णय चूकीचा ठरवत तिसऱ्या पंचांनी नाबाद घोषित केले. यानंतर दोन चेंडूनंतर गैफ यांनी पुन्हा एकदा गेलला LBW आऊट दिले, पण तिसऱ्या पंचांनी पुन्हा एकदा गेलला नाबाद घोषित केले.आयपीएलमध्ये पंचांच्या चुकीच्या निर्णयाने अनेक वाद झाले होते आता वर्ल्ड कपमध्ये अशा प्रकाराने ती चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

वाचा- World Cup : धोनीनं लष्कराला दिला अनोखा सन्मान, 'या' एका कृतीमुळं जिंकलं चाहत्यांच मन

वाचा-धोनीच्या मुद्द्यावरून पाकिस्तानात रणकंदन ; ‘तो क्रिकेट खेळायला गेला आहे, महाभारतासाठी नाही'

वाचा- #DhoniKeepTheGlove : ‘पाकिस्तानच्या खेळाडूंचा नमाज चालतो, मग धोनीचे ग्लोव्ह्ज का नाही’ ; चाहते संतापले


VIDEO : World Cup मध्ये भारताचे सामने फिक्स? पहिल्या विजयानंतर 'या' अफवा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 02:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...