News18 Lokmat

World Cup : किसमें कितना है दम ! इंग्लंड आणि साऊथ आफ्रिकामध्ये 'काटे की टक्कर'

इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांनी एकदाही वर्ल्ड कप जिंकलेला नाही.

News18 Lokmat | Updated On: May 29, 2019 08:51 PM IST

World Cup : किसमें कितना है दम ! इंग्लंड आणि साऊथ आफ्रिकामध्ये 'काटे की टक्कर'

लंडन, 29 मे : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019च्या सामन्यात पहिली लढत होणार आहे ती, इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्या विरोधात. गुरुवारी लंडनच्या ओव्हल मैदानावर हा सामना होणार असून, दोन्ही संघ आपल्या पहिल्या विश्वविजेतेपदासाठी सज्ज आहेत. दरम्यान इंग्लंडकरिता 2015चा विश्वचषक निराशाजनक होता तर, साऊथ आफ्रिकेच्या संघानं सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती. मात्र त्यांना विजेतेपदावर आपले नाव कोरता आले नाही.

दरम्यान, आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेटच्या रॅंकीगनुसार इंग्लंडचा संघ सध्या पहिल्या क्रमांकावर आहे तर, साऊथ आफ्रिकेचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2015च्या विश्वचषकानंतर इंग्लंड संघाने तब्बल 38वेळा 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. इंग्लंडचा संघ इओन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे तर, साऊथ आफ्रिकेचा संघ फाफ ड्यु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळेल. मात्र ऐन विश्वचषकादरम्यान साऊथ आफ्रिकेचा महत्त्वाचा गोलंदाज डेल स्टेन दुखापतग्रस्त झाल्यामुळं त्यानं माघार घेतली आहे. याचा फटका इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात साऊथ आफ्रिकेला बसू शकतो.

इंग्लंडचा वर्ल्ड कप इतिहास

इंग्लंडचा संघ बलाढ्य असला तरी, एकदाही तो चॅम्पियन बनू शकलेला नाही. इंग्लंडच्या 1979, 1987 आणि 1992मध्ये फायनलपर्यंत धडक मारली आहे. मात्र त्यांना विजेतेपद मिळवता आले नाही.

साऊथ आफ्रिकेचा वर्ल्ड कप इतिहास

Loading...

इंग्लंड बरोबरच साऊथ आफ्रिकेच्या संघालाही विजेतेपद जिंकता आलेले नाही. दरम्यान त्यांनी 1992, 1999, 2007 आणि 2015मध्ये सेमीफायनलपर्यंत धडक मारली आहे. त्यामुळं यंदा या संघाचे लक्ष्य चोकर्स हा टॅग पुसणे असणार आहे.

इंग्लंड-साऊथ आफ्रिका आमने-सामने

या दोन्ही संघातील एकदिवसीय क्रिकेटमधले आकडे पाहिल्यास त्यांच्यात द्वंद्व युध्द दिसून येते. इंग्लंडनं साऊथ आफ्रिका विरोधात 59 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यातील 26 सामन्यात विजय मिळवता आला आहे तर, 29 सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. इंग्लंडनं आपल्या घरच्या मैदानावर आफ्रिकेच्या संघाला 15वेळा नमवले आहे तर, 8वेळा पराभव पत्करला आहे.

वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ समान

विश्वचषकात इंग्लंड आणि साऊथ आफ्रिकेचा संघ एकूण 6 सामने झाले आहेत. यातील 3 सामने इंग्लंड तर, 3 सामने साऊथ आफ्रिकेने जिंकले आहेत. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात या दोन्ही संघात काटे की टक्कर होणार हे नक्की.

साऊथ आफ्रिकेचा संघ : फाफ डुप्लेसीस(कर्णधार),, क्विंटन डी कॉक, हाशिम आमला, एडेन मार्करम, रेसी वैन डर डुसां, डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, प्रिस्टोरियस, फेलुकवायो, डेल स्टेन, रबाडा, लुंगी एन्गिडी, एनरिज नॉर्तजे, इमरान ताहिर आणि तबरेज शम्सी.

इंग्लंडचा संघ: जॉनी बेयरस्टो, जेसन रॉय, जो रूट, ऑयन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, जॉस बटलर, मोइन अली, क्रिस वोक्स, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, मार्क वुड, जेम्स विंस, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन आणि टॉम करन.


वाचा-  World Cup : चोकर्सचा ठप्पा मिटवण्यासाठी साऊथ आफ्रिकेचा संघ सज्ज

वाचा-World Cup : 1 ट्रॉफी, 46 दिवस, 48 सामने, 10 संघ...कोण मारणार बाजी ?

वाचा-….म्हणून तहान-भूक विसरून वर्ल्डकप खेळतोय साऊथ आफ्रिकेचा 'हा' फलंदाज


नागपुरात उष्माघातामुळे 10 जणांचा आकस्मिक मृत्यू; या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2019 08:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...