England vs South Africa : आता एवढचं बाकी होत, साऊथ आफ्रिकेच्या कर्णधारानं चोरली धोनीची रणनीती

नाणेफेक जिंकत ड्यु प्लेसिसिनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 05:29 PM IST

England vs South Africa : आता एवढचं बाकी होत, साऊथ आफ्रिकेच्या कर्णधारानं चोरली धोनीची रणनीती

ओव्हल, 30 मे : जगभरातील क्रिकेटप्रेमी ज्या स्पर्धेची गेली पाच वर्ष वाट पाहत होते, त्या विश्वचषक स्पर्धेला आता सुरुवात झाली आहे. दरम्यान पहिला सामना इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात ओव्हलच्या मैदानावर होत आहे. साऊथ आफ्रिकेने प्रथम नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यात साऊथ आफ्रिकेचा कर्णधार ड्यु प्लेसिस यानं भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनी रणनीती वापरल्याचे चित्र दिसले.

नाणेफेक जिंकत ड्यु प्लेसिसिनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये चेंडु दिला तो, फिरकीपटू इमरान ताहीर यांच्या हातात. ड्यु प्लेसिसच्या या रणनीतीला यशही आले, आणि दुसऱ्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर बेअरस्टो शुन्यावर बाद झाला.

काय आहे धोनीचं कनेक्शन

आता तुम्हाला वाटेल धोनी साऊथ आफ्रिकेच्या संघाचा भाग आहे. मात्र तसे काही नाही. तर, आयपीएलमध्ये ड्यु प्लेसिसि आणि धोनी चेन्नई संघाकडून खेळताता. दरम्यान आयपीएलमध्येही धोनी बऱ्याचवेळा मोक्याच्या क्षणी पहिली ओव्हर फिरकी गोलंदाजांच्या हातात देतो. दरम्यान आयपीएलमध्ये त्याच्या रणनीती यशही आले होते. एवढेच नाही तर, ताहीरही चेन्नई संघाकडून खेळत होता. त्यामुळं धोनीच्या नेतृत्वाचे परिणाम या दोन्ही खेळाडूंवर दिसून आले.

इमरान ताहीरनं रचला इतिहास

Loading...

विश्वचषकात फिरकी गोलंदाजांन पहिली ओव्हर केली आहे, असे चित्र सहसा दिसत नाही. दरम्यान इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यातील सामन्यात इमरान ताहिरनं आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेत एक इतिहास रचला आहे.

इंग्लंड-साऊथ आफ्रिका आमने-सामने

या दोन्ही संघातील एकदिवसीय क्रिकेटमधले आकडे पाहिल्यास त्यांच्यात द्वंद्व युध्द दिसून येते. इंग्लंडनं साऊथ आफ्रिका विरोधात 59 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यातील 26 सामन्यात विजय मिळवता आला आहे तर, 29 सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. इंग्लंडनं आपल्या घरच्या मैदानावर आफ्रिकेच्या संघाला 15वेळा नमवले आहे तर, 8वेळा पराभव पत्करला आहे.

साऊथ आफ्रिकेचा संघ : फाफ डुप्लेसीस(कर्णधार), क्विंटन डी कॉक, हाशिम आमला, एडेन मार्करम, रेसी वैन डर डुसां, डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, प्रिस्टोरियस, फेलुकवायो,रबाडा, लुंगी एन्गिडी, एनरिज नॉर्तजे, इमरान ताहिर आणि तबरेज शम्सी.

इंग्लंडचा संघ: जॉनी बेयरस्टो, जेसन रॉय, जो रूट, ऑयन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, जॉस बटलर, मोइन अली, क्रिस वोक्स, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, मार्क वुड, जेम्स विंस, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन आणि टॉम करन.


वाचा- England vs South Africa : IPL गाजवणारा 'हा' खेळाडू ठरला गोल्डन डकचा मानकरी

वाचा- हा कसला वर्ल्ड कप, स्पर्धेतील बदलावर सचिन नाराज

वाचा- आपलंच नाव गुगलवर सर्च करतो हा खेळाडू, जडेजाने केला खुलासा


VIDEO : मोदींच्या शपथविधीला ममता राहणार अनुपस्थित; या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 05:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...