इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणारा ओव्हर थ्रोचा नियम बदलणार!

ICC Cricket World Cup च्या अंतिम सामन्यात मार्टिन गुप्टिलने केलेल्या ओव्हर थ्रोमुळं इंग्लंडला अतिरिक्त चार धावा मिळाल्या.

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 02:36 PM IST

इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणारा ओव्हर थ्रोचा नियम बदलणार!

लॉर्ड्स, 19 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये अंतिम सामन्याचा निकाल सुपर ओव्हरवर ठरला. पहिल्यांदा सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यातही पुन्हा टाय झाल्यावर चौकार-षटकारांच्या जोरावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. यानंतर आयसीसीच्या नियमाव टीका केली जात आहे. दरम्यान, इंग्लंडच्या शेवटच्या षटकात ओव्हर थ्रोवर पंचांनी दिलेल्या धावांची चर्चाही होत आहे. त्या नियमावरही क्रिकेटप्रेमींनी टीका केली होती.

ओव्हर थ्रोचा हा नियम आता बदलण्याची शक्यता आहे. thetimes.co.uk ने दिलेल्या बातमीनुसार एमसीसी वादग्रस्त ओव्हर थ्रोच्या नियमाची समीक्षा करण्याच्या तयारीत आहे. अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात तीन चेंडूत इंग्लंडला 9 धावांची गरज होती. तेव्हा डीप मिडविकेटवरून गुप्टिलनं केलेला थ्रो बेन स्टोक्सच्या बॅटला लागून चौकार गेला. त्यानंतर पंच कुमार धर्मसेना यांनी दुसरे पंच इरासमुस यांच्याशी चर्चा करत, इंग्लंडला सहा धावा दिल्या. यात दोन धावा खेळाडूंनी धावत काढल्या तर, चार धावा ओव्हरथ्रोच्या मिळाल्या. या सहा धावांमुळं 242 धावांचा पाठलाग करणारा इंग्लंड 241 धावा करू शकला. त्यामुळं हा सामना टाय झाला.

ICCने सचिनला Hall Of Fameमध्ये स्थान देण्यास केला उशीर? 'हे' आहे कारण

'सहा नाही पाचच धावा'

ओव्हर थ्रोच्या धावा देताना पंचांकडून चुक झाल्याचं माजी आंतरराष्ट्रीय पंच सायमन टफेल यांनीही म्हटलं. ओव्हर थ्रोवर सहा धावा नाही तर पाच धावाच द्यायला हव्या होत्या असंही स्पष्ट केलं. टफेल यांच्या या वक्तव्यानंतर क्रिकेट प्रेमींनी आयसीसीनं पुन्हा विचार करावा आणि अजुनही वेळ गेलेली नाही असं म्हटलं आहे.

Loading...

VIDEO : असा कॅच तुम्ही वर्ल्ड कपमध्येही पाहिला नसेल, पाहा टी-20चा थरार!

ओव्हर थ्रोसाठी नियम

ओव्हर थ्रोसाठी आयसीसीनं दिलेल्या 19.8 नियमानुसार जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूमुळं जर चेंडू सीमापार गेला तर, त्याचा फायदा दुसऱ्या संघाला होतो. मात्र जर, फलंदाजानं थ्रो करण्याआधी धाव पूर्ण केली नसेल तर, एक अतिरिक्त धाव फलंदाजाला मिळत नाही. त्यामुळं जेव्हा गुप्टिलनं थ्रो केला तेव्हा बेन स्टोक्स क्रिजमध्ये नव्हता. त्यामुळं दोन रन ऐवजी केवळ एक धाव देणे गरजेचे होते. त्यामुळं पंचाच्या एका चूकीमुळं न्यूझीलंडला वर्ल्ड कप गमवावा लागला.

इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्याचा न्यूझीलंड करणार सन्मान!

मास्टर ब्लास्टरच्या शिरपेचात मानाचा तुरा, ICCनं 'हा' सन्मान देऊन केला गौरव

VIDEO: अजित पवार म्हणाले, रामदास आठवलेंसारखं जमायला लागलं बुवा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 02:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...