लॉर्ड्स, 14 जुलै: क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर आज ICC Cricketw world cup 2019चा विजेता ठरणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यासारख्या दिग्गज संघांना बाहेरचा रस्ता दाखवत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी फायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळं क्रिकट विश्वाला आज एक नवा विश्वविजेता मिळणार आहे. त्यामुळं सर्वांची नजर या सामन्यावर असली तरी, लॉर्ड्सच्या हवामनाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
दीड महिन्यापूर्वी वर्ल्ड कपची सुरुवात झाल्यानंतर अनेकांनी कल्पनाही केली नसले की विजेतेपदासाठी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होईल. साखळी फेरीतून गुणतक्त्यात तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेले संघ अंतिम फेरीत पोहोचले असून यंदाची अंतिम लढत ही ऐतिहासिक अशी ठरणार आहे. वर्ल्ड क्रिकेटच्या इतिहासात 29 वर्षानंतर अशी फायनल होणार आहे ज्यातून क्रिकेटविश्वाला नवा विजेता मिळेल. या दोन्ही संघांनी आतापर्यंत विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळे जो संघ जिंकेल तो इतिहास घडवेल.
फायनलवरही पावसाचे सावट
सध्य दोन्ही संघ आणि चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारण आजच्या महामुकाबल्यातही पाऊस खोडा घालू शकतो. आज दिवसभर लॉर्ड्समध्ये ढगाळ वातवरणाची नोंद झाली आहे, मात्र पावसाची शक्यता तमी आहे. दरम्यान संध्याकाळी काही काळ पाऊस बरसू शकतो. आज लॉर्ड्समध्ये 21-23 तापमान असणार आहे.
We had a spot of rain in the morning, but the skies have cleared up now 🌤️
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 14, 2019
Here's hoping we don't need these for the rest of the day! #CWC19 pic.twitter.com/A1QmNt0OCA
उन्ह पडलं तर इंग्लंड, ढगाळ वातावरण असेल तर न्यूझीलंड
आज होणाऱ्या अंतिम लढतीत क्रिकेटविश्वाला नवा विजेता मिळणार आहे. 23 वर्षानंतर प्रथमच दोन संघ पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकतील. याआधी 1996च्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेच्या संघाने प्रथम विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 4 वेळ तर भारताने एकदा वर्ल्ड कप जिंकला होता. लॉर्ड्सची खेळपट्टी पाहता जर उन्ह पडले तर त्याच फायदा इंग्लंडला होऊ शकतो कारण पिच सपाट असेल. या उलट खेळपट्टीत दव असेल आणि वातावरण ढगाळ असेल तर त्याचा फायदा न्यूझीलंडला होईल आणि ते विजेते होतील.
अशी आहे लॉर्ड्सची खेळपट्टी
वर्ल्ड कपमधील लॉर्ड्स मैदानाचा इतिहास पाहता जो संघ प्रथम फलंदाजी करतो त्याला फायदा होतो. तसेच पहिला फलंदाजी करणारा संघ 300 पेक्षा जास्त धावा करतो. पण अंतिम सामन्यासाठी नव्या खेळपट्टीचा वापर केला जाणार आहे. नवी खेळपट्टीवर काही प्रमाणात गवत दिसत आहे त्यामुळे ही खेळपट्टी गोलंदाजांना मदत मिळेल असे मानले जाते.
नाणेफेक महत्त्वाची ठरणार?
स्पर्धेत आतापर्यंत जेव्हा जेव्हा इंग्लंडने धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा तेव्हा त्यांचा डाव कोसळला आहे. त्यामुळेच नाणेफेक जिंकून इंग्लंड प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभा करण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड देखील प्रथम फलंदाजीसाठी प्रयत्न करेल. अशा परिस्थितीत नाणेफेक महत्त्वाची ठरेल यात शंका नाही.
VIDEO: ब्रह्मपुत्रा नदीचं रौद्ररूप, पाण्यातल्या बोटीसारखी वाहून गेली शाळा