चॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता!

वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरदेखील टाय झाली. त्यानंतर आयसीसीने ज्या नियमाच्या आधारे विजेता घोषित केला त्यावर अनेक दिग्गजांनी आक्षेप घेतला.

  • Share this:

ICC Cricket World Cup चा अंतिम सामना होऊन आठवडा उलटला तरी त्याची चर्चा काही थांबत नसल्याचं दिसत आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात सुपर ओव्हरपर्यंत थरार रंगला. यात सुपर ओव्हरमध्येसुद्धा सामना टाय झाल्यानं अखेर चौकार षटकारांच्या संख्येवर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं आहे.

इंग्लंडने पहिल्यांदा विजेतेपद पटकावलं असलं तरी त्याला वादाची किनार लागली आहे. अनेक दिग्गजांनी आयसीसीच्या सुपर ओव्हरच्या नियमांवर आक्षेप घेतला. आता ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी सुपर ओव्हरमध्येही टाय झाल्यावर विजेता कसा निवडायला हवा हे सांगितलं आहे.

इयान चॅपेल यांनी म्हटलं आहे की, अंतिम सामन्यात टाय झाल्यास दोन्ही संघांच्या सुरुवातीच्या कामगिरीवर निर्णय द्यायला हवा. दोन्ही संघांचे गुणतक्त्यात असलेल्या स्थानावरून विजेता घोषित करायला हवा. जर सुपर ओव्हरमध्येही टाय झाला तर कोणत्याही वादाशिवाय गुणतक्त्याच्या आधारावर विजेता घोषित करता येईल.

चॅपेल यांनी सुचवलेल्या पर्यायानुसार जर निर्णय घ्यायचा झाला तरी इंग्लंडच विजेता झाला असता. त्यांनी साखळी फेरीतसुद्दा न्यूझीलंडला सहज पराभूत केलं होतं.

सर्व सामान्यपणे एखाद्या सामन्यात दोन्ही संघांनी समान धावसंख्या केली तर त्यांना समान गुण दिले जातात. अंतिम सामन्यात असे करता येत नाही. यासाठी सुपर ओव्हरचा नियम करण्यात आला सुपर ओव्हरमध्ये देखील सामना टाय झाला तर दोन्ही संघांपेकी ज्या संघाने अधिक चौकार मारलेत त्यांना विजयी घोषित केले जाते. याच नियमाच्या आधारावर इंग्लंडने पहिला वर्ल्ड कप जिंकला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 10:57 AM IST

ताज्या बातम्या