AUS vs ENG : 44 वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता करणार का इंग्लंड?

AUS vs ENG : 44 वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता करणार का इंग्लंड?

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तब्बल 44 वर्षांनी सेमीफायनलचा सामना खेळला जाणार आहे.

  • Share this:

बर्मिंगहॅम, 11 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडनं भारताला 18 धावांनी पराभूत केल्यानंतर आज दुसरा सेमीफायनल सामना होणार आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात आज बर्मिंगहॅमच्या मैदानावर सामना होत आहे. सलग दुसऱ्यांदा फायनल खेळणार्या न्यूझीलंडचे आजच्या सामन्यावर विशेष लक्ष असणार आहे. 2015मध्ये न्यूझीलंडचा सामना ऑस्ट्रेलियासोबत झाला होता. वर्ल्ड कपच्या इतिहासात ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 5 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. तर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांना एकदाही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. याआधी साखळी सामन्यात इंग्लंड- ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत झाली होती, यावेळी ऑस्ट्रेलियानं बाजी मारली होती.

44 वर्षांनंतर सेमीफायनलमध्ये आमने- सामने

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तब्बल 44 वर्षांनी सेमीफायनलचा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघ 1975मध्ये एकमेकांविरोधात भिडले होते. आतापर्यंत ऑस्ट्रेलियानं सेमीफायनलमध्ये एकही सामना त्यांनी गमावलेला नाही. तर इंग्लंड 1992नंतर पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये उतरली आहे.

साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियानं केली होती इंग्लंडवर मात

दोन्ही संघांना सध्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र याआधी झालेल्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियानं 64 धावांनी इंग्लंडचा पराभव केला होता. साखळी फेरीत ऑस्ट्रेलियानं 9 सामन्यातील 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, इंग्लंडनं 9 सामन्यात 6 सामन्यात विजय मिळवला आहे.

गेल्या 12 सामन्यात इंग्लंडचा पगडा भारी

मात्र जर गेल्या 12 सामन्यातील लेखाजोखा पाहिलास इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियावर भारी पडली आहे. 12 सामन्यांपैकी 10 सामन्यात इंग्लंडनं विजय मिळवला आहे. जेसॉन रॉय आणि बेअरस्टो यांच्या फॉर्मचा ऑस्ट्रेलियाला फायदा होऊ शकतो. तर, ऑस्ट्रेलियाकडे वॉर्नर आणि फिंच असे दोन तगडे फलंदाज आहेत.

वाचा- World Cup: धोनीच बाद होणं लागलं जिव्हारी, चाहत्याचा झाला मृत्यू!

वाचा- WORLD CUP : टीम इंडियाने सामना हरला पण तरीही भारतच चॅम्पियन!वाचा- World Cup : पराभवानंतर धोनीला केन विल्यम्सननं दिली ही ऑफर, पाहा VIDEO

VIDEO: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: July 11, 2019, 2:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading