Elec-widget

World Cup : इंग्लंडला मोठा झटका, महत्त्वाच्या सामन्याआधी मुख्य खेळाडू जखमी

World Cup : इंग्लंडला मोठा झटका, महत्त्वाच्या सामन्याआधी मुख्य खेळाडू जखमी

इंग्लंडचा वर्ल्ड कपमधील 27 वर्षातील इतिहास बघितला तर त्यांना यावेळी सेमीफायनल गाठणं कठीण आहे.

  • Share this:

लंडन, 24 जून: ICC Cricket World Cupमध्ये यजमान इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. याआधी श्रीलंकेकडून मिळालेल्या पराभवामुळं इंग्लंडची वाटचाल खडतर झाली होती. त्यातच आता त्यांचा मुख्य खेळाडू, महत्त्वाच्या सामन्यांना मुकणार आहे. इंग्लंडला आता ऑस्ट्रेलिया, भारत व न्यूझीलंड या तीन तगड्या प्रतिस्पर्धींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळं या खेळाडूचं संघात नसणं इंग्लंडला महागात पडणार आहे.

इंग्लंडचा सलामीवीर जेसॉन रॉय पायचे स्नायू आकडल्यामुळं ऑस्ट्रेलियाविरोधात खेळू शकणार नाही आहे. वेस्ट इंडिज विरोधात 14 जूनला झालेल्या सामन्यात जेसॉन जखमी झाला होता. त्यानंतर तो फलंदाजीसाठी उतरला नाही. सोमवारी फिटनेस टेस्ट दरम्यान त्याला नेट्मध्ये फलंदाजी करता आली नाही. त्यामुळं ऑस्ट्रेलियाविरोधात मंगळवारी होणाऱ्या सामन्याला जेसॉन मुकणार आहे. याआधी अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्या विरोधात जेसॉन खेळू शकला नव्हता. तर, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली होती.

मात्र, जेसॉनच्या अनुपस्थितीचा फटका श्रीलंकेविरुद्ध यजमानांना बसला, त्यांना हा सामना गमवावा लागला होता. दरम्यान इंग्लंड क्रिकेट मंडळाने या वृत्ताला दुजोरा दिलेला नसला तरी रॉय कांगारूंविरोधात खेळणार नाही आहे, हे स्पष्ट झाले आहे.

Loading...

पाकच्या विजयानं वाढली यजमानांची धाकधुक

दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून पाकचे 6 सामन्यात 5 गुण झाले आहेत. जर पाकिस्तानने पुढचे तीनही सामने जिंकले तर त्यांना सेमिफायनलला जागा मिळू शकते. पाकिस्तानने उर्वरित सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचे 11 गुण होतील. पाकिस्तानच्या वर लंकेचा संघ असून ते एका सामन्यात जरी पराभूत झाले आणि इतर सामन्यात विजय मिळवला तर त्यांचे 10 गुण होतील. तर बांगलादेशसुद्धा एका सामन्यात पराभतू झाल्यास त्यांनाही 10 गुण मिळवता येतील. या दोन्ही संघांना भारताशी लढायचे आहे. त्यात विजय मिळवणं लंकेला आणि बांगलादेशला कठीण आहे. बांगलादेश आणि लंकेच्या पराभवाशिवाय यजमान इंग्लंडच्या जय पराजयावर पाकिस्तानची पुढची वाटचाल ठरणार आहे.

इंग्लंडच्या वाटेत इतिहासाचा अडथळा

इंग्लडचे आता तीन सामने राहिले आहेत. त्यात त्यांचा सामना ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड यांच्याशी होणार आहे. यामुळे त्यांच्यावर वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचण्याचं मोठं आव्हान असणार आहे. इंग्लंडची तीन सामन्यात अशा संघांसोबत गाठ पडणार आहे जे सध्या टॉप 4 मध्ये आहेत. इंग्लंडचा वर्ल्ड कपमधील 27 वर्षातील इतिहास बघितला तर त्यांना यावेळी सेमीफायनल गाठणं कठीण आहे. 1992 पासून त्यांना ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड यांच्याविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. या तीन संघाविरुद्ध त्यांना 10 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

वाचा- आता जगाला मिळाला दुसरा धोनी, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांचा खळबळजनक दावा

वाचा- World Cup : कोण आहे ही हॉट अ‍ॅंकर, सचिनसोबतचा सेल्फी झाला VIRAL

वाचा-ऑन फिल्ड हिटमॅन तर ऑफ फिल्ड दम्शराज किंग, VIDEO VIRAL

' पिवळी साडीवाली' अधिकारी महिलेच्या डान्सचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 07:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...