ENG vs AUS : आज लॉर्ड्सवरवर दिसणार अ‍ॅशेसची झलक, इंग्लंडसाठी विजय महत्त्वाचा

दोन्ही संघांसाठी हा सामना मह्त्वाचा आहे, कारण हा सामना म्हणजे अ‍ॅशेसची एक झलक असणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2019 02:03 PM IST

ENG vs AUS : आज लॉर्ड्सवरवर दिसणार अ‍ॅशेसची झलक, इंग्लंडसाठी विजय महत्त्वाचा

लॉर्ड्स, 25 जून : ICC Cricket World Cupमध्ये आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना मह्त्वाचा आहे, कारण हा सामना म्हणजे अॅशेसची एक झलक असणार आहे. त्यामुळं अ‍ॅशेसप्रमाणे या सामन्याकडे उत्सुकतेने पाहिले जाते. दरम्यान इंग्लंडला आपले आव्हान टिकवण्यासाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. कारण श्रीलंकेकडून 20 धावांनी पराभूत झाल्यामुळे इंग्लंडच्या आव्हानाला धक्का बसला आहे.

इंग्लंड संघानं 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळाल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी सुधारत जागतिक क्रमवारीत जोमाने प्रगती केली. वर्ल्ड कपमध्ये त्यांनी दमदार सुरुवातही केली मात्र हेडिंग्लेच्या खेळपट्टीवर श्रीलंकेनं दिलेल्या 233 धावांचे माफक आव्हान पेलताना इंग्लंडचा संघ 212 धावांवर गारद झाला. त्यामुळं आज ऑस्ट्रेलियाविरोधात सामना जिंकणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण प्रथमच विश्वविजेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या या संघाला यापुढे भारत आणि न्यूझीलंड या कडव्या संघांशी सामना करायचा आहे.

तर, दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ चांगल्या जोमात आहे. ऑस्ट्रेलियाने भारताकडून पत्करलेल्या पराभवाव्यतिरिक्त अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघांना नमवून सहा सामन्यांत 10 गुण मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.

जेसॉन रॉयची कमी भासणार

इंग्लंडचा सलामीवीर जेसॉन रॉय पायचे स्नायू आकडल्यामुळं ऑस्ट्रेलियाविरोधात खेळू शकणार नाही आहे. वेस्ट इंडिज विरोधात 14 जूनला झालेल्या सामन्यात जेसॉन जखमी झाला होता. त्यानंतर तो फलंदाजीसाठी उतरला नाही. सोमवारी फिटनेस टेस्ट दरम्यान त्याला नेट्मध्ये फलंदाजी करता आली नाही. त्यामुळं ऑस्ट्रेलियाविरोधात मंगळवारी होणाऱ्या सामन्याला जेसॉन मुकणार आहे. याआधी अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्या विरोधात जेसॉन खेळू शकला नव्हता. तर, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली होती.

Loading...

इंग्लंडच्या वाटेत इतिहासाचा अडथळा

इंग्लडचे आता तीन सामने राहिले आहेत. त्यात त्यांचा सामना ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड यांच्याशी होणार आहे. यामुळे त्यांच्यावर वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचण्याचं मोठं आव्हान असणार आहे. इंग्लंडची तीन सामन्यात अशा संघांसोबत गाठ पडणार आहे जे सध्या टॉप 4 मध्ये आहेत. इंग्लंडचा वर्ल्ड कपमधील 27 वर्षातील इतिहास बघितला तर त्यांना यावेळी सेमीफायनल गाठणं कठीण आहे. 1992 पासून त्यांना ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड यांच्याविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. या तीन संघाविरुद्ध त्यांना 10 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

वाचा- World Cup Point Table : बांगलादेश ठरणार जायंट किलर, भारतालाही धोका

वाचा- World Cup: 'भारताकडून पराभव झाल्यानंतर आत्महत्या करावी वाटली'

वाचा-अर्जुन तेंडुलकर वर्ल्ड कपमध्ये करतोय इंग्लंडला मदत, 'हे' आहे कारण

बेस्टला अच्छे दिन येणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 02:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...