World Cup : इंग्लंडची चिंता वाढली, ऐन वर्ल्ड कपमध्ये बदलावा लागणार कर्णधार

World Cup : इंग्लंडची चिंता वाढली, ऐन वर्ल्ड कपमध्ये बदलावा लागणार कर्णधार

यजमान इंग्लंडच्या अडचणी वाढल्या आहेत, दोन खेळाडू सध्या जखमी झाले आहेत.

  • Share this:

लंडन, 18 जून : ICC World Cup 2019मध्ये यजमान इंग्लंड संघाकडून चाहत्यांना सर्वात जास्त अपेक्षा आहे. इंग्लंडचा संघ सध्या चांगल्या जोमात आहे. त्यांनी सलग दोन सामने जिंकले आहे. आज अफगाणिस्तान विरोधात आपल्य़ा हॅट्रीकसाठी इंग्लंडचा संघ सज्ज आहे. गुणतालिकेवर नजर टाकल्यास इंग्लंडचा संघ सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. 4 पैकी 3 सामने त्यांनी जिंकले आहे. पाकिस्तान विरोधात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. इंग्लंडकडे सध्या 6 गुण आहेत. आज त्यांची लढत अफगाणिस्तान विरोधात होणार आहे.

सध्या सर्व संघ सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी झगडत असताना, यजमानांचा कर्णधारच बदलणार आहे. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन जखमी झाल्यामुळं आज अफगाणिस्तान विरोधात होणाऱ्या सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबत शंका आहेत. त्यामुळं मॉर्गनच्या जागी जॉस बटलरकडे इंग्लंडचे कर्णधारपद जाऊ शकते. शुक्रवारी वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या सामन्यात मॉर्गनच्या पाठीचे स्नायू आकडल्यामुळं त्याला मैदान सोडावे लागले होते.

यासंदर्भात बटलरनं पत्रकार परिषदेत, "अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात मॉर्गन खेळणार की नाही याबाबत शंका आहेत. माझी इच्छा आहे की, तो खेळावा. मात्र तो खेळला नाही तरी, आमची रणनीती बदलणार नाही. आम्ही मॉर्गनच्या नेतृत्वाखाली बरेच वर्ष खेळत आहोत. तो एक शानदान कर्णधार आहे. त्यामुळं आज मॉर्गन खेळला नाही तर, उप-कर्णधार म्हणून कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारेन".

दुखापतींचे करायचे काय?

सध्या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक सामन्यात खेळाडूंना दुखापत होत आहे. भारतीय संघातील शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार हे दोन खेळाडू जखमी आहेत. तर, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गन जखमी झाल्यानंतर त्यांचा सलामीचा फलंदाज जेसन रॉयही वेस्ट इंडिज विरोधात जखमी झाला होता. त्यामुळं जेसन आजच्या सामन्यात खेळणार नाही आहे. त्यामुळं इंग्लंड संघाच्या चिंता वाढल्या आहेत.

वाचा- सानियानं काढला 'ती'च्यावर राग म्हणाली, 'मी पाकिस्तान संघाची आई नाही'

वाचा- पुन्हा बांगलादेशचा संघ ठरला जायंट किलर, वेस्ट इंडिज विरोधात केले 'हे' रेकॉर्ड

वाचा- World Cup : आमचा कर्णधार बिनडोक, शोएबची सर्फराजवर जहरी टीका

लाजा धरा लाजा, पाकच्या आजीनी सर्फराजला झापलं, VIDEO व्हायरल

First published: June 18, 2019, 10:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading