लंडन, 27 जून : ICC Cricket World Cupमध्ये सध्या सेमिफायनलसाठी दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान वगळता सर्व संघांमध्ये चुरस रंगली आहे. ऑस्ट्रेलिया संघानं सेमिफायनलमध्ये आपले स्थान निश्वित केले आहे. तर, न्यूझीलंड आणि भारत या दोन्ही देशांनाही जवळजवळ सेमिफायनलचे तिकीट मिळवले आहे. मात्र, यजमान इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात लॉर्ड्सवर पराभव स्विकारल्यानंतर त्यांचे सेमिफायनल गाठण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे.
इंग्लंडला मिळालेल्या सलग तीन पराभवामुळे त्यांचे सेमिफायनलमधील स्थान धोक्यात आलेच आहे. मात्र आता ICCच्या वन डे क्रमवारीतील अव्वल स्थानही त्यांना गमवावे लागले आहे. ताज्या क्रमवारीनुसार इंग्लंडची दुसऱ्या स्थानी घसरण झाली असून भारतीय संघ अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. सध्या भारतीय संघ 123 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर, इंग्लंडला दोन गुणांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यांच्या खात्यात 122 गुण आहेत. मे 2018 पासून इंग्लंड अव्वल स्थानावर होता. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याकडून मिळालेल्या पराभवामुळं इंग्लंडला हा फटका बसला आहे.
इंग्लंडला पाकिस्तान, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. वर्ल्ड कपच्य गुणतालिकेत 7 सामन्यांमध्ये 8 गुणांसह इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंडचे भारत आणि न्यूझीलंड हा तगड्या प्रतिस्पर्धी संघासोबत दोन सामने बाकी आहेत. त्यामुळे त्यांना प्रवेश मिळेल की नाही याबाबत अनिश्चितता आहे. दुसरीकडे भारतीय संघ हा वर्ल्ड कपमधला अपराजित संघ आहे. पाच सामन्यांपैकी त्यांनी 4 सामने जिंकले आहेत तर, 1 सामना पावसामुळं रद्द झाला. यामुळं भारतीय संघानं ICC क्रमवारित पहिला क्रमांक गाठला आहे. तर, न्यूझीलंड दोन गुणांची कमाई करून 166 गुणांसह तिसऱ्या स्थानी कायम आहे. वर्ल्ड कपमधून बाहेर गेलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घसरण झाली आहे तर, ऑस्ट्रेलिया तीन गुणांच्या कमाईसह 112 गुणांसह चौथ्या स्थानी आले आहेत.
इंग्लंडच्या वाटेत इतिहासाचा अडथळा
इंग्लडचे आता दोन सामने राहिले आहेत. त्यात त्यांचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्याशी होणार आहे. यामुळे त्यांच्यावर वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचण्याचं मोठं आव्हान असणार आहे. इंग्लंडची तीन सामन्यात अशा संघांसोबत गाठ पडणार आहे जे सध्या टॉप 4 मध्ये आहेत. इंग्लंडचा वर्ल्ड कपमधील 27 वर्षातील इतिहास बघितला तर त्यांना यावेळी सेमीफायनल गाठणं कठीण आहे. 1992 पासून त्यांना ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड यांच्याविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. या तीन संघाविरुद्ध त्यांना 10 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
वाचा- IND vs WI : अरे चाललयं काय, भारत वेस्ट इंडिज विरोधात खेळतचं नाहीये तर...
वाचा- सचिनला भारतीय संघात नको आहे शमी, हॅट्ट्रिक करूनही नाकारण्याचे 'हे' आहे कारण
वाचा- पाकचा माजी क्रिकेटर म्हणतो, 'भारत श्रीलंका, बांगलादेशविरुद्ध मुद्दाम हरणार'
अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा