इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्याचा न्यूझीलंड करणार सन्मान!

न्यूझीलंड ऑफ द इयरसाठी केन विल्यम्सनसह 10 खेळाडूंचे नामांकन देण्यात आले असून यात इंग्लंडच्या बेन स्टोक्सचाही समावेश आहे.

  • Share this:

ICC Cricket World Cup मध्ये सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडपेक्षा जास्त चौकार-षटकार मारल्यानं इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. इंग्लंडच्या विजयात मोलाची कामगिरी बजावलेल्या बेन स्टोक्सला न्यूझीलंडमध्ये टीकेचा धनी व्हावं लागलं. आता त्याच न्यूझीलंडकडून स्टोक्सला मोठा सन्मान दिला जाणार आहे. बेन स्टोक्सला न्यूझीलंड ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

बेन स्टोक्स इंग्लंडसाठी खेळत असला तरी इथले लोक त्याला न्यूझीलंडचे मानतात असं न्यूझीलंड ऑफ द इयर पुरस्काराचे चीफ जज कॅमरॉन बेनट यांनी म्हटलं आहे. त्याच्याशिवाय 10 जणांचे नामांकन असून यामध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनचा समावेश आहे.  डिसेंबर महिन्यात हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

इंग्लंडचा संपूर्ण संघ मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळत होता पण बेन स्टोक्स मात्र त्याच्या जन्मभूमीविरुद्धच लढला. स्टोक्सचा जन्म 4 जून 1991 मध्ये न्यूझीलंडमधील ख्राइस्टरचर्चमध्ये झाला.बेन स्टोक्सचे वडील रग्बी प्रशिक्षक होते.

बेन ज्यावेळी 12 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडीलांची नियुक्ती इंग्लंडमध्ये वर्किंग्टन टाउन रग्बीच्या प्रशिक्षकपदी झाली. त्यावेळी त्यांना इंग्लंडला स्थलांतर करावे लागले. इंग्लंडला आल्यानंतर बेन स्टोक्सनं क्रिकेट शिकायला सुरुवात केली. स्टोक्स सध्या इंग्लंडमध्येच असला तरी त्याच्या आई वडिल 2013 पासून न्यूझीलंडमध्येच राहत आहेत.

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनं न्यूझीलंडविरुद्ध 84 धावांची खेळी केली. 50 षटकांचा सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्येही त्यानं जबरदस्त फलंदाजी केली. स्पर्धेत त्यानं 465 धावा काढल्या. तर गोलंदाजी करताना 7 गडी बाद केले.

अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात तीन चेंडूत इंग्लंडला 9 धावांची गरज होती. तेव्हा डीप मिडविकेटवरून गुप्टिलनं केलेला थ्रो बेन स्टोक्सच्या बॅटला लागून चौकार गेला. त्यानंतर पंच कुमार धर्मसेना यांनी दुसरे पंच इरासमुस यांच्याशी चर्चा करत, इंग्लंडला सहा धावा दिल्या. यात दोन धावा खेळाडूंनी धावत काढल्या तर, चार धावा ओव्हरथ्रोच्या मिळाल्या. या सहा धावांमुळं 242 धावांचा पाठलाग करणारा इंग्लंड 241 धावा करू शकला. त्यामुळं हा सामना टाय झाला.

इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्टोक्सला नाइटहुड पुरस्काराचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे. जर त्याला नाइटहुड पुरस्कार दिला तर तो इंग्लंडचा 12 क्रिकेटपटू ठरेल. याआधी 2019 मध्ये अॅलिस्टर कूकला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 11:50 AM IST

ताज्या बातम्या