'वर्ल्ड कप भारताला मिळायला हवा', हे मजेशीर कारण वाचलंत का?

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांना संयुक्त विजेता घोषित करून वर्ल्ड कप मात्र भारताला द्यावा असं म्हणत एक अजब फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

  • Share this:

आयसीसीच्या चौकार-षटकारांच्या नियमावरून अनेकांनी सुनावलं. अनेकांनी म्हटलं की ज्या संघाने कमी विकेट गमावल्या त्यांना विजेतेपद द्या. तर काहींनी संयुक्त विजेतेपद देण्याची मागणी केली. मात्र, आता या केवळ चर्चा उरल्या आहेत.

ICC Cricket World Cup चा अंतिम सामना होऊन एक आठवडा उलटला. त्याआधी सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवाला दोन आठवडे होत आले. यानंतरही वर्ल्ड कपचीच चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. अंतिम सामन्याचा थरार आणि त्यातले वाद अजुनही चर्चेचा विषय आहेत.

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना झाला. यात दोन्ही संघांनी 50 षटकांत 241 धावा केल्या. त्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यातही दोन्ही संघांनी 15 धावा केल्या. अखेर सुपर ओव्हरच्या नियमानुसार चौकार-षटकारांच्या संख्येवर इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आला.

रवीना टंडनने व्हायरल फोटो शेअर केला आहे. यात जगाचा नकाशा असून भारत हा इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या मध्यावर आहे. त्यामुळे दोन्ही देशांना विजेता घोषित करून वर्ल्ड कप भारतात ठेवायला पाहिजे असा तर्क लावण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र भारत इंग्लंडपासून 7 हजार किलोमीटर तर न्यूझीलंडपासून 12 हजार किलोमीटर दूर आहे.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने एक मजेशीर ट्विट केलं आहे. यात तिनं वर्ल्ड कपचे जेतेपद दोघांना संयुक्त घोषित करायला हवं होतं. अशा परिस्थितीत तो भारताला द्यायला हवा असंही म्हटलं आहे. यासाठी एक फोटोही तिनं शेअर केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 10:06 AM IST

ताज्या बातम्या