26 व्या वर्षी कारकिर्द संपली तरी इंग्लंडला मिळवून दिलं विजेतेपद!

26 व्या वर्षी कारकिर्द संपली तरी इंग्लंडला मिळवून दिलं विजेतेपद!

2015 च्या वर्ल्ड कपमध्ये तो इंग्लंडकडून खेळला पण दुर्दैवानं एक वर्षातच त्याची क्रिकेट कारकिर्द संपुष्टात आली.

  • Share this:

लॉर्ड्स, 16 जुलै : रविवारी 14 जुलैला झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने पहिल्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं. सुपर ओव्हरपर्यंत रंगलेला थरार अखेर इंग्लंडने जिंकला. इंग्लंडच्या विजयात सलामीवीर जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो यांनी स्पर्धेत चांगली सुरुवात करून दिली. मधल्या षटकात जो रूट आणि इयॉन मॉर्गन यांनी धावा केल्या. जेव्हा जेव्हा आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले तेव्हा बेन स्टोक्स संघाच्या मदतीला धावून आला. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्स, लियाम प्लंकेट यांनी चमक दाखवली. मात्र या संघाच्या मागे एका अशा व्यक्तीचंसुद्धा योगदान आहे ज्याने मैदानावर न उतरता इंग्लंडला विजेता होण्यात महत्वाची भूमिका बजावली.

इंग्लंडच्या संघाचा चीफ सिलेक्टर जेम्स टेलर इंग्लंडकडून गेल्या वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. मात्र, वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी त्याची क्रिकेट कारकिर्द संपुष्टात आली. जेम्स टेलरला 2016 मध्ये त्याच्या हृदयाला छिद्र असल्याचं निदान झालं. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याचे प्राण वाचले पण त्याचं क्रिकेट करिअर मात्र तिथेच संपलं होतं. इंग्लंडचं भविष्य म्हणून जेम्सकडे पाहिलं जात होत पण मैदानावरील त्याचं क्रिकेट स्वप्नात जमा झालं होतं.

क्रिकेटर म्हणून त्याची कारकिर्द संपुष्टात आली तरी जेम्सने हार मानली नाही. 2018 मध्ये त्याला इंग्लंडचा चीफ सिलेक्टर करण्यात आलं. त्यानंतर लगेच त्याने संघाला जगज्जेता करण्यासाठी रणनीति आखायला सुरू केली. संघाच्या खेळात आक्रमकता यावी यासाठी त्याने प्रयत्न केले.

जेम्स टेलरनं इंग्लंडच्या विजयानंतर सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यानं लिहलं की, चार वर्षांचा प्रवास जबरदस्त राहिला. एक खेळाडू म्हणून सुरुवात केली आणि आता सिलेक्टर म्हणून काम करत आहे. मला याची जाणीव कधीच झाली नाही. हा संघ प्रतिभावान खेळाडूंनी भरला असून त्यांचा अभिमान वाटतो.

कोंबडा भिडला सापला, VIDEO व्हायरल

First published: July 16, 2019, 9:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading