World Cup : ‘या’ खेळाडूमुळं वर्ल्ड कपआधी पाकिस्तान संघातील वाद चव्हाट्यावर

विश्वचषकाला आठ दिवस उरले असताना, संघातील खेळाडूंमध्येच सूत्र बिघडले असल्याचे चित्र दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 01:21 PM IST

World Cup : ‘या’ खेळाडूमुळं वर्ल्ड कपआधी पाकिस्तान संघातील वाद चव्हाट्यावर

कराची, 22 मे : क्रिकेटच्या विश्वातील सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणजे आयसीसी वर्ल्ड कप. या विश्वचषकासाठी आता केवळ आठ दिवसांचा कालावधी उरला असताना, सर्व संघ सराव सामन्यासाठी सज्ज झाले आहे. प्रत्येक संघ विश्वचषक जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. मात्र यात पाकिस्तानच्या संघात मात्र खेळाडूंमध्येच सर्व सूत्र बिघडले असल्याचे चित्र दिसत आहे. याचे कारण आहे, पाकिस्तानचा एक खेळाडू. या एका खेळाडूमुळं पाकिस्तान संघातील वाद चव्हाट्यावर आले आहेत.

विश्वचषकाआधी पाकिस्तानच्या संघाला इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात दारुण पराभव सहन करावा लागला. त्यामुळं निवड समितीनं संघात काही मोठे बदल केले. निवड समितीनं 23 खेळाडूंच्या संभाव्य संघातही नसलेल्या खेळाडूला संघात स्थान दिल्यानं नवा वाद सुरु झाला आहे. हा खेळाडू आहे, पाकिस्तानचा जलद गोलंदाज वहाब रियाज. मात्र, पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनीच वहाब रियाजच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे.

प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यात मतभेद

पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांनी एप्रिल 2018मध्ये रियाजच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले होते. रियाज 2017च्या चॅम्पियन ट्रॉफीनंतर एकही सामना खेळा नाही आहे. त्यामुळं त्याला पुन्हा संधी देणे म्हणजे युवा खेळाडूंवर अविश्वास दाखवण्या सारखं आहे.

इंग्लंडमध्ये रियाज फेल

Loading...

वहाब रियाज या जलद गोलंदाजाकडे गती आणि अनुभव असला तरी, इंग्लंडमध्ये त्याचे आकडे खराब आहेत. रियाजला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव फारच कमी आहे. त्यानं 7 सामन्यात केवळ 4 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या इकॉनॉमी रेट केवळ 6.67 आहे. निवड समितीचा प्रमुख इंजमाम-उल-हक यांनी आपल्या वैयक्तिक संबंधांमुळं रियाजला संघात दिला असल्याचा आरोपही काही चाहत्यांनी केला आहे.

इंजमाम विरुद्ध संघ

निवड समितीचे प्रमुख इंजमाम- उल-हक यांनी इंग्लंडमध्ये गोलंदाजांनी केलेल्या निराशाजनक खेळीमुळं संघात काही मोठे बदल केले. दरम्यान त्यांनी वहाब रियाजला दिलेल्या या संधीत. वहाबचा अनुभव फायदेशीर असेल, तो चेंडू चांगला स्विंग करता. त्यामुळं संघाला नक्कीच फायदा होईल, असे सांगितले. मात्र संघातील इतर खेळाडू इंजमाम यांच्या या निर्णयावर नाखुश आहेत.

पाकिस्तानचा संघ : सरफराज अहमद, बाबर आज़म, फ़खर ज़मान, इमाम उल हक, हैरिस सोहेल, आसिफ अली, मोहम्मद हफीज, इमाद वसीम, हसन अली, शाहीन शाह अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद हसनैन, शादाब खान, शोएब मलिक, वहाब रियाज.

वाचा- World Cup : पाकिस्तानचा सामना कसा करणार? विराटनं दिलं हे उत्तर

वाचा- World Cup : महिलेसोबत गैरवर्तन, कॉमेंटेटरला विमानातून उतरवलं

वाचा- World Cup : भारताचा हा 'कच्चा दुवा' ठरणार डोकेदुखी?


VIDEO : आमदाराच्या हत्येनंतर मोठा उद्रेक, रस्त्यावर उतरून लोकांकडून निषेध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2019 01:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...