IND vs BAN : धोनीनं कीपिंग सोडल्यानंतर पंतच्या हातात दिले ग्लोव्ह्ज, चाहते झाले हैराण

IND vs BAN : धोनीनं कीपिंग सोडल्यानंतर पंतच्या हातात दिले ग्लोव्ह्ज, चाहते झाले हैराण

बांगलादेश विरोधात झालेल्या सामन्यात 12व्या षटकात धोनीनं मैदान सोडले होते. त्यानंतर त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले.

  • Share this:

लंडन, 03 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारतानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. असे असले तरी हा वर्ल्ड कप भारताचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्रसिंग धोनीसाठी विशेष चांगला ठरलेला नाही. त्यामुळं धोनी वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार की काय, यावर चर्चा सुरु झाली आहे. यातच बांगलादेश विरोधात झालेल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीनं चालू सामन्यातच मैदान सोडले, त्यामुळं ऋषभ पंतनं किपींगची जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले. इंग्लंडविरोधात झालेल्या सामन्यात धोनीच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळंच बांगलादेशविरोधात धोनीनं दोनवेळा मैदान सोडले.

बांगलादेशविरुद्ध भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी 180 धावांची खेळी केली. रोहित शर्माने 104 तर केएल राहुलनं 77 धावांची खेळी करून भारताला भक्कम सुरूवात करून दिली. मात्र, त्यानंतरही भारताचा डाव गडगडला. 1 बाद 180 मध्ये 134 धावांची भर घालण्यासाठी भारताने 8 गडी गमावले. यात पंत, धोनी, कोहली वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. यामुळे पुन्हा भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनंतर मधल्या फळीत भरवशाचा फलंदाज कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भारताच्या गोलंदाजी दरम्यान 12व्य़ा षटकात धोनीनं मैदान सोडले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे पहिल्यांदा झाले आहे की, धोनीनं दुखापतींमुळे मैदान सोडले. त्यामुळं ऋषभ पंतनं एका ओव्हरसाठी कीपिंग केले होते.

वर्ल्ड कपनंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा

37 वर्षीय महेंद्रसिंग धोनी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. याआधी धोनीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड कप 2019 हा धोनीचा शेवटचा विश्वचषक असेल. पीटीआयला बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "धोनी कधीही निवृत्ती जाहीर करू शकतो. त्यानं देशासाठी खुप केलं आहे. याआधी त्यानं कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता कारण त्याला फलंदाजीवर लक्षकेंद्रित करायचे होते. सध्या वर्ल्ड कपमध्ये त्याचा फॉर्म चांगला आहे त्यामुळं तो निवृत्ती जाहीर करू शकतो". यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये धोनीचा स्ट्राईक रेट सर्वात कमी आहे. त्यामुळं धोनीवर सतत टीका केली जात आहे. त्यामुळं धोनी निवृत्ती घेऊ शकतो.

बांगलादेशविरोधात होते चार किपर एकाच संघात

बांगलादेशविरोधात झालेल्या सामन्यात भारतानं संघात काही बदल केले होते. कुलदीप यादवच्या जागी भुवनेश्वर कुमार तर, केदार जाधवच्या जागी दिनेश कार्तिकला संघात संधी देण्यात आली होती. त्यामुळं एकाच संघात ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, केएल राहुल आणि दिनेश कार्तिक असे चार किपर होते.

दुखापतग्रस्त आहे भारतीय संघ

भारतीय संघानं बांगलादेशला नमवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं नॉक आऊट फेरीत भारताला सर्वोच्च खेळ करावा लागणार आहे. मात्र भारतीय संघ सध्या दुखातपतींनी ग्रस्त आहे. सगळ्यातआधी संघाचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन जखमी झाला, त्यानंतर विजय शंकरही वर्ल्ड कपबाहेर पडला. भुवनेश्वर कुमारही तीन सामने खेळू शकला नव्हता. त्यात आता धोनीच्या अंगठ्याला दुखापत झाल्यानं तो श्रीलंका विरोधात खेळणार की नाही, याबाबत शंका आहे.

VIDEO: मध्य रेल्वेचा गलथानपणा प्रवाशांच्या जीवावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 03:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading