World Cup : 'भारताचा पराभव निश्चित', न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूनं सांगितला मास्टरप्लॅन

World Cup : 'भारताचा पराभव निश्चित', न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूनं सांगितला मास्टरप्लॅन

ICC Cricket World Cupमध्ये सध्या न्यूझीलंडचा संघ हा गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.

  • Share this:

नॉटिंघम, 11 जून : ICC Cricket World Cupमध्ये सध्या न्यूझीलंडचा संघ हा गुणतालिकेत पहिल्या क्रमांकाचा संघ आहे. त्यांनी आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, त्या तीनही सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे. त्यामुळं आता त्यांचं लक्ष भारताला हरवणे असणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गुरुवारी सामना होणार आहे. एकीकडे न्यूझीलंडचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे तर, दुसरीकडे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला धुळ चारली. भारत गुणतालिकेत सध्या तीसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघ सध्या चांगल्या लयीत असल्यामुळं, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.

मात्र, न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू डॅनियल व्हिटोरी यानं न्यूझीलंड सामना जिंकणारच असा विश्वास व्यक्त करत, आपल्या संघाचा मास्टरप्लॅनही सांगितला. विटोरीनं, “न्यूझीलंडला जर सामना जिंकायचा असेल तर त्यांनी दबावमुक्त खेळण्याची गरज आहे. न्यूझीलंडचे गोलंदाज भारतावर दबाव टाकतील त्यामुळं न्यूझीलंड हा सामना जिंकू शकतो”, असे सांगितले. याधी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सराव सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव स्विकारावा लागला होता. भारताचा संपुर्ण संघ 179 धावात बाद झाला होता.

भारतीय खेळाडूंसाठी ट्रेंट बोल्ट धोकादायक

न्यूझीलंडच्या दौऱ्यात हॅमिल्टन येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघ केवळ 92 धावाच ऑलआऊट झाला होता. त्यावेळी अंबाती रायडू आणि विजय शंकर यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान या मैदानावर गोलंदाजांना विशेष फायदा गहोणार आहे. त्यामुळं ट्रेंट बोल्ट भारतासाठी धोकादायक ठरू शकतो. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सराव सामन्यात बोल्टनं चार विकेट घेतल्या होत्या. त्यानं भारताला केवळ 179 धावांत बाद केले. त्यामुळं बोल्ट भारतासाठी धोकादायक ठरु शकतो.

भारताविरुद्ध बोल्टचे रेकॉर्ड चांगले

न्यूझीलंडचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्टचे भारताविरुद्ध रेकॉर्डस चांगले आहेत. त्यानं भारताविरोधात 12 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात 22 विकेट घेतल्या आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 150 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय गोलंददाजांच्या यादीत त्याच्या तीसरा क्रमांक लागतो.

8 सामन्यात 5 वेळा धवन बोल्टचा शिकार

ऑस्ट्रेलियाविरोधात शतकी खेळी करणारा शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापतत झाल्यामुळं तो न्यूझीलंड विरोधाकत खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. दरम्यान बोल्टनं 8 सामन्याक तब्बल 5 वेळा बाद केले आहे.

वाचा-विराटची चिंता वाढली, धडाकेबाज सलामीवीर पुढच्या सामन्याला मुकणार?

वाचा- अखेर पावसामुळं दक्षिण आफ्रिकेनं उघडले खाते, भारत तिसऱ्या क्रमांकावर

वाचा- भारत-पाक सामन्याबद्दल अख्तरची भविष्यवाणी, हा संघ आहे फेवरेट

पूर्वमोसमी पावसामुळे मुंबईत विमानसेवा विस्कळीत, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

First published: June 11, 2019, 1:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading