World Cup : पाकचे आव्हान संपुष्टात येताच शोएब मलिकची कारकिर्द संपली

World Cup : पाकचे आव्हान संपुष्टात येताच शोएब मलिकची कारकिर्द संपली

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे.

  • Share this:

लंडन, 05 जुलै : पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. World Cupमध्ये बांगलादेशविरुद्ध विजय मिळवल्यानंतर पत्रकार परिषदेत मलिकने ही घोषणा केली. बांगलादेशविरुद्ध विजय मिळवल्यानंतर पाक संघातील खेळाडूंनी त्याला निरोप दिला. शोएब मैदान सोडत असताना सर्व खेळाडू सीमे रेषेजवळ थांबले होते आणि सर्वात प्रथम त्याला ड्रेसिंग रुमध्ये प्रवेश दिला.

पाकिस्तानने त्याला भारताविरुद्धच्या सामन्यानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतलं नाही. शोएब मलिकला भारताविरुद्ध भोपळाही फोडता आला नव्हता. त्यानंतरच्या सामन्यात त्याला संधी दिली नव्हती. स्पर्धेपूर्वीच शोएब मलिकनं जाहीर केलं होतं की हा त्याचा शेवटचा वर्ल्ड कप असेल. पाकिस्तानचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले आहे.

शोएब मलिकने तीन सामन्यात फक्त 8 धावा केल्या. इंग्लंडविरुद्ध त्यानं फक्त 8 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध त्याला एकही धाव काडता आली नाही. आता त्याला निवृत्तीचा सामन्या खेळण्यासाठी संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

याआधी दिग्गज क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज वसीम आक्रमने म्हटलं होतं की, शोएब मलिकनं अशी कामगिरी केली नाही की ज्याच्या जोरावर त्याला संघात स्थान मिळेल. हे क्लब क्रिकेट नाही त्यामुळं निवृत्तीचा सामना खेळण्यासाठी बोलावलं जाईल. वाटलंच तर त्याच्यासाठी निरोप समारंभ ठेवू असं आक्रमनं म्हटलं होतं.

वसीम आक्रमने म्हटलं होतं की, त्याचं नशीब चांगलं नसल्यानं क्रिकेट कारकिर्द अशा पद्धतीने संपणार आहे. त्यानं पाकिस्तानसाठी खूप काही केलं पण वर्ल्ड कप मात्र खराब झाला. दोन वेळा शून्यावर बाद झाला. याआधी त्याने पाकिस्तानला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्याच्या कामगिरीत सातत्य नाही आणि असं कोणी मुद्दाम करत नाही असंही आक्रम यांनी म्हटलं होतं.

World Cup : श्रीलंकेविरोधात बुमराह खेळण्याची शक्यता कमी, कोण घेणार जागा?

World Cup: भर मैदानात निर्वस्त्र शिरला चाहता, सामन्यात घातला धिंगाणा

First published: July 6, 2019, 7:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading