लंडन, 05 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघानं आपल्या कामगिरीच्या जोरावर सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. बांगलादेशला नमवत भारतीय संघानं दणक्यात सेमीफायनलमध्ये एण्ट्री केली. या सामन्यात सर्वांच आकर्षण ठरल्या त्या पिपाणीवाल्या आजी. भारत-बांगलादेश सामन्यात सोशल मीडियावर 87 वर्षीय चारूलता पटेल चांगल्याच व्हायरल झाल्या होत्या. सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही चारूलता पटेल यांची भेट घेतली होती.
आता मात्र या आजी टिव्हिवरही दिसणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चारूलता पटेल या पेप्सिकोच्या जाहिरातींमध्ये दिसणार आहेत. पेप्सिकोनं वर्ल्ड कपमध्ये #HarGhoontMeinSwagHai या हॅशटॅगसह जाहिरात करत आहेत. पेप्सिकोनं दिलेल्या माहितीनुसार, "चारूलता यांच्यामुळं आम्हाला फायदा होणार आहे. त्यांची कहाणी खुपच छान आणि प्रेरणादायी आहे". त्यामुळं चारूलता यांना जाहिरात मिळणार आहे. पेप्सिकोसह बियॉन्स आणि प्रियांका चोप्रासारखे सेलेब्रिटी आहेत. आता चारुलता यांना पेप्सिको स्वॅग स्टार म्हणून समोर आणतील.
Find out who she is & I promise I will reimburse her ticket costs for the rest of the India matches!😊 https://t.co/dvRHLwtX2b
— anand mahindra (@anandmahindra) July 2, 2019
भारताची फलंदाजी सुरु असताना चारूलता यांचा पिपाणी वाजवतानाचा व्हि़डिओ व्हायरल झाला होता. तर, दुसरीकडे महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा यांनी चारूलता यांना तिकीट देण्याचे जाहीर केले होते.
वाचा- पाकचा कर्णधार बावळट त्यात संघ भित्रा, शोएब अख्तर पुन्हा भडकला
वाचा- 'अरे तुझ्या तोंडापेक्षा बूट मोठा आहे', रोहितनं घेतली चहलची फिरकी
वाचा- World Cup : इंग्लंडमध्ये सुरक्षित नाही भारतीय संघ, ICCने केले हात वर
World Cup: भर मैदानात निर्वस्त्र शिरला चाहता, सामन्यात घातला धिंगाणा