Elec-widget

World Cup : इंग्लंडनं पहिल्यांदाच जिंकला वर्ल्ड कप, तरी ICCने दिली नाही खरी ट्रॉफी

आयसीसीकडून वर्ल्ड कपसाठी एक कोटी डॉलर म्हणजे 70.12 कोटींची बक्षिस रक्कम निश्चित करण्यात आली होती.

  • Share this:

ICC Cricket World 2019चा अंतिम सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेला सामना रोमांचक ठरला. न्यूझीलंडला नशीबाची साथ मिळाली नाही त्यामुळं अखेर सुपरओव्हरमध्ये इंग्लंडनं सामना जिंकला.

वर्ल्ड कपच्या इतिहासात 23 वर्षांनी नवा चॅम्पियन मिळाला. या विजयासह यजमानांनी आपला पहिला वर्ल्ड कप जिंकला, त्यामुळं त्यांच्यांवर बक्षिसांचा वर्षाव झाला आहे.

आयसीसीकडून वर्ल्ड कपसाठी एक कोटी डॉलर म्हणजे 70.12 कोटींची बक्षिस रक्कम निश्चित करण्यात आली होती. त्यामुळं इंग्लंडला 40 लाख डॉलर म्हणजेच 28 कोटी रुपये मिळणार आहेत.

आयसीसीनं वर्ल्ड कपसाठी एक कोटी डॉलर म्हणजे 70.12 कोटींची बक्षिस रक्कम निश्चित करण्यात आली होती. त्यामुळं इंग्लंडला 40 लाख डॉलर म्हणजेच 28 कोटी रुपये मिळणार आहेत.

तर, उपविजेत्या ठरलेल्या न्यूझीलंड संघाला 14 कोटी रूपयांची बक्षिस रक्कम देण्यात आली. त्याशिवाय सेमीफायनल खेळणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांना 5.5-5.5 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

तर, लीग स्टेजमध्ये जिंकणाऱ्या संघांना 40-40 हजार डॉलर म्हणजेच 28 लाख रूपये, तर नॉकआऊटमध्ये पोहचणाऱ्या संघांना 70 लाख रूपये बक्षिस रक्कम देण्यात आली.

Loading...

दरम्यान विजेत्या संघांना खरी ट्रॉफी देण्यात आलेली नाही. त्यामुळं पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंडला ट्रॉफीची प्रतिकृती देण्यात आली. खरी ट्रॉफी आयसीसीकडे ठेवण्यात येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 11:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...