World Cup : फलंदाजांची झोप उडवणाऱ्या बुमराहच्या यॉर्कर मागचे 'हे' आहे रहस्य

World Cup : फलंदाजांची झोप उडवणाऱ्या बुमराहच्या यॉर्कर मागचे 'हे' आहे रहस्य

बांगलादेशविरोधात बुमराहनं 4 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळं भारतानं सामना जिंकला.

  • Share this:

लंडन, 03 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये बांगलादेशला नमवत भारतीय संघानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. बांगलादेशविरुद्ध भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी 180 धावांची खेळी केली. रोहित शर्माने 104 तर केएल राहुलनं 77 धावांची खेळी करून भारताला भक्कम सुरूवात करून दिली. मात्र, त्यानंतरही भारताचा डाव गडगडला. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने अर्धशतकी खेळी केली. शाकिबला बाद करून पांड्याने मोठं यश मिळवून दिलं. शाकिबने 74 चेंडू 66 धावा केल्या. त्याच्याशिवाय सौम्या सरकार, शब्बीर रहमान आणि मोहम्मद सैफुद्दीन यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत धावगती नियंत्रणात आणली. बुमराहने 4 तर पांड्याने 3 विकेट घेतल्या. चहल, भुवी आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली आणि भारताला सेमीफायनलचे तिकीट मिळवून दिले.

यात जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे योगदान महत्त्वाचे होते. सध्या वर्ल्ड कपमध्ये बुमराह हुकुमी एक्का ठरत आहे. संघाला गरज असताना त्यानं भारताला महत्त्वाच्या विकेट मिळवून दिल्या. बुमराह सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. मोहम्मह शमी आणि बुमराह यांच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतानं आपला विजयीरथ कायम ठेवला आहे. बुमराह म्हणजे अंतिम टप्प्यात फलंदाजांचा कर्दनकाळ, त्याचा यॉर्करहा फलंदाजांची झोप उडवतो.

बांगलादेशविरोधातही असेच झाले, आठ विकेट गेल्यानंतरही सामन्यामध्ये चुरस टिकून होती. बुमराहनं आपल्या 49व्या ओव्हरमध्ये महत्वाच्या क्षणी दोन भन्नाट यॉर्कर टाकून बांगलादेशचे शेपूट गुंडाळले. त्यामुळे भारतानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्याक बुमराहनं 55 धावात चार विकेट घेतल्या. नव्या चेंडूने गोलंदाजी करताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यामध्ये बुमराह माहीर आहे.

याबाबत बुमरहानं सामना झाल्यानंतर आपल्या यॉर्कर मागचे रहस्य सांगितले. "मी नेटमध्ये सराव करताता कोणत्या परिस्थितीला कशी गोलंदाजी करावी, हा विचार करून खेळतो. नव्या चेंडूने सुरुवातीचे ओव्हर असो किंवा डेथ ओव्हर मी प्रत्येक परिस्थितीनुसार गोलंदाजीचा सराव करतो". बुमराहने या वर्ल्डकपमध्ये 4.6 च्या सरासरीने सात सामन्यात 14 विकेट काढल्या आहेत. त्याने महत्वाच्या क्षणी आपल्या यॉर्कर चेंडूंचा प्रभावी वापर केला आहे.

बुमराहच्या यॉर्कर मागचे रहस्य

बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वी घेतलेल्या मुलाखतीत बुमराहनं, "मी लहानपणी जेव्हा सराव करायचो तेव्हा फक्त, यॉर्क चेंडू टाकायचो. तेव्हा मला फारसे काही कळायचे नाही. मला फक्त एवढे माहित होते की यॉर्कर टाकला की गोलंदाज बाद होतो. त्यामुळं मी फक्त त्याचा सराव करायचो. त्यामुळे माझ्या मनात असे समीकरणच तयार झाले की यॉर्कर चेंडू टाकले तरच बळी मिळतो", असे सांगितले. BCCI ने बुमराहची एक छोटीशी मुलाखत ट्विट केली आहे. या मुलाखतीत त्याने अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. तसेच बुमराहनं, "माझ्यासाठी माझे रॅकींग महत्त्वाचे नाही, संघाचा विजय महत्त्वाचा आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधात आम्हाला चांगली सुरुवात मिळाली, त्यामुळं लय कायम राखता आली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरोधातही माझी रणनीती तीचं होती, त्याचा फायदा मला झाला", असेही या मुलाखतीत बुमराह म्हणाला.

वाचा- मोठी बातमी, वर्ल्ड कपमधील शेवटच्या सामन्यात धोनी करणार क्रिकेटला अलविदा?

वाचा- धक्कादायक! क्रिकेटपटू अंबाती रायडूची निवृत्ती, IPLही खेळणार नाही

वाचा- भारतीय संघानं डावललं, अंबाती रायडूला क्रिकेट खेळण्यासाठी नागरिकत्वाची ऑफर!

VIDEO: मध्य रेल्वेचा गलथानपणा प्रवाशांच्या जीवावर

First published: July 3, 2019, 4:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading