आजींची गोलंदाजी पाहून तुम्ही बुमराहलाही विसराल, एकदा तरी पाहाच 'हा' VIDEO

आजींची गोलंदाजी पाहून तुम्ही बुमराहलाही विसराल, एकदा तरी पाहाच 'हा' VIDEO

बुमराहच्या गोलंदाजी शैलीची आजींनी नक्कल केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 जुलै : ICC Cricket World Cupमधून भारतीय संघ बाहेर पडला आहे, हे सत्य चाहत्यांना पचवणे कठीण जात आहे. मात्र, या सगळ्यात चारूलता आजीनंतर आणखी एका आजींनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यांनी चक्क भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची नक्कल केली आहे. त्याच्या अनोख्या गोलंदाजीच्या शैलीनं सर्वांनाच भुरळ पाडली आहे.

अहमदाबादच्या या गोलंदाजांनं अल्पावधीतच भारतीय संघाच्या प्रमुख गोलंदाजाचा मान पटकावला. गोलंदाजीच्या अनोख्या शैलीमुळे बुमराहनं टाकलेल्या यॉर्कर चेंडूचा अंदाज बांधणे भल्याभल्या फलंदाजांना अवघड जाते. डेथ ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघांच्या धावा रोखण्याची जबाबदारी बुमराह सक्षमपणे पार पाडत आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेतही त्यानं चोख भूमिका बजावली. वर्ल्ड कपमध्ये त्याने 18 विकेट्स घेतल्या आहे. मात्र बुमराहच्या या शैलीची आजींनी केलेली नक्कल सगळ्यांचे मन जिंकत आहे.

याआधी भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एक लहान मुलगा बुमराहच्या गोलंदाजीची कॉपी करताना दिसला होता. पण, आता चक्का आज्जीबाईच बुमराहच्या यॉर्करची कॉपी करताना पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या आजींच्या व्हिडिओवर बुमराहनं, “या आजींनी माझा दिवस बनवला”, असे ट्वीट करत व्हिडिओ टाकला होता.

दरम्यान भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर बुमराहनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली होती. यात त्यानं, '' माझे सर्व सहकारी, प्रशिक्षक, साहाय्यक प्रशिक्षक, कुटुंबातील सदस्य आणि सर्व चाहत्यांचे आभार मानतो. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला.'', असे ट्वीट केले आहे.

वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्येच आहे. दरम्यान त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. तेथे तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत.

VIDEO: ब्रह्मपुत्रा नदीचं रौद्ररूप, पाण्यातल्या बोटीसारखी वाहून गेली शाळा

First published: July 14, 2019, 12:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading