World Cup : VIDEO : बेन स्टोक्सला बॅटही उचलू दिली नाही, पाहा स्टार्कचा मास्टरस्ट्रोक

ICC Cricket World Cup 2019 : स्टार्कच्या गोलंदाजीवर बोल्ड झाल्यानंतर मैदानावर पडलेल्या बॅटला बेन स्टोक्सनं रागाच्या भरात पायानं लाथ मारली.

News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2019 06:40 AM IST

World Cup : VIDEO : बेन स्टोक्सला बॅटही उचलू दिली नाही, पाहा स्टार्कचा मास्टरस्ट्रोक

लॉर्ड्स, 26 जून : ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याचा शेवटपर्यंत सामना करणाऱ्या बेन स्टोक्सला बाद करून मिशेल स्टार्कनं विजयातील मोठा अडथळा दूर केला. मिशेल स्टार्कने इंग्लंडच्या चार फलंदाजांना बाद केलं. त्याने मधल्या फळीला खिंडार पाडून ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर केला. तर बेहरनडॉर्फने 5 विकेट घेत निम्मा संघ गारद केला.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 286 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 36 व्या षटकांत इंग्लंडच्या 5 बाद 177 धावा झाल्या होत्या. त्यावेळी बेन स्टोक्स मैदानात होता. 115 चेंडूत 89 धावा करणाऱ्या स्टोक्सला 37 व्या षटकात अखेरच्या चेंडूवर स्टार्कने यॉर्करवर बोल्ड केलं. स्टार्कचा हा चेंडू इतका वेगवान होता की बेन स्टोक्सला काही समजायच्या आधीच त्रिफळा उद्ध्वस्त करून गेला होता. त्यानंतर चिडलेल्या स्टोक्सने मैदानावर पडलेल्या बॅट पायाने उडवली.

Loading...

इंग्लंडला 286 धावांचा पाठलाग करताना 221 धावांपर्यंतच मजल मारता आली. बेहरनडॉर्फ आणि स्टार्कच्या माऱ्यासमोर इंग्लंडचा निम्मा संघ गारद झाला. त्याने 5 गडी बाद केले. इंग्लंडकडून बेन स्टोक्स वगळता एकाही फलंदाजाला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर टिकता आलं नाही. सलामीवीर जेम्स विन्सला बेहरनडॉर्फनं बाद केलं. त्यानंतर स्टार्कने जो रूट आणि इयॉन मॉर्गनला बाद करून आघाडीची फळी तंबूत धाडली. त्यानंत बेहरनडॉर्फने बेअरस्टोला बाद करून मोठा अडथळा दूर केला. बेन स्टोक्स आणि जोस बटलरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण बटलरला बाद करून स्टोईनिसने जोडी फोडली.त्यानंतर बेन स्टोक्सला 89 धावांवर स्टार्कने बाद केलं. नंतर मोईन अली, ख्रिस वोक्स आणि जोफ्रा आर्चरला बाद करून ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. शेवटी ख्रिस वोक्सने पेंट कमिन्सला बाद करून विजयावर शिक्कामोर्तब केलं.

तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने फिंचच्या शतकाच्या आणि वॉर्नरच्या अर्धशतकाच्या जोरावर 50 षटकांत 285 धावा केल्या.ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अॅरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी 123 धावांची भागिदारी केली. वॉर्नरला बाद करून मोईन अलीने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. वॉर्नर 53 धावांवर बाद झाला. त्यानंतर फिंचने ख्वाजासोबत अर्धशतकी भागिदारी केली. ख्वाजाला स्टोक्सने 23 धावांवर बाद केलं.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने 116 चेंडूत 100 धावा केल्या. त्यानंतर लगेच शतक साजरं करणाऱ्या फिंचला जोफ्रा आर्चरने ख्रिस वोक्सकडं झेल देण्यास भाग पाडलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. मधल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाले. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक 2 गडी बाद केले. तर आर्चर, वूड, स्टोक्स, मोईन अली यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

दोन्ही संघांसाठी हा सामना मह्त्वाचा आहे, कारण हा सामना म्हणजे अॅशेसची एक झलक असणार आहे. त्यामुळं अ‍ॅशेसप्रमाणे या सामन्याकडे उत्सुकतेने पाहिले जाते. दरम्यान इंग्लंडला आपले आव्हान टिकवण्यासाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. कारण श्रीलंकेकडून 20 धावांनी पराभूत झाल्यामुळे इंग्लंडच्या आव्हानाला धक्का बसला आहे.

वाचा- World Cup Point Table : बांगलादेश ठरणार जायंट किलर, भारतालाही धोका

वाचा- World Cup: 'भारताकडून पराभव झाल्यानंतर आत्महत्या करावी वाटली'

वाचा-अर्जुन तेंडुलकर वर्ल्ड कपमध्ये करतोय इंग्लंडला मदत, 'हे' आहे कारण

बेस्टला अच्छे दिन येणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 26, 2019 06:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...