World Cup गाजवणाऱ्या खेळाडूवर BCCI करणार कारवाई?

World Cup गाजवणाऱ्या खेळाडूवर BCCI करणार कारवाई?

भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूने स्पर्धेदरम्यान नियमाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जुलै : ICC Cricket World Cup स्पर्धेनंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या संघाची घोषणा रविवारी होणार आहे. दरम्यान भारतीय संघातील खेळाडूंनी वर्ल्ड कपवेळी नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप असून आता बीसीसीआय कारवाई करण्याची शक्यता आहे. स्पर्धेवेळी नियमानुसार परवानगीपेक्षा जास्त दिवस पत्नीला सोबत ठेवल्याप्रकरणी वरिष्ठ खेळाडूंवर कारवाई केली जाऊ शकते.

बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना वर्ल्ड कपवेळी आपल्या पत्नीला 15 दिवस सोबत ठेवण्याची परवानगी दिली होती. मात्र, स्पर्धेवेळी जवळपास 7 आठवडे काही खेळाडूंची पत्नी त्यांच्यासोबत होती. यासाठी खेळाडूंनी कर्णधार किंवा प्रशिक्षकाची परवानगीही घेतली नव्हती. आता नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने खेळाडूंना धारेवर धरलं आहे.

भारतीय संघातील एका वरिष्ठ खेळाडूने स्पर्धेदरम्यान पत्नी सोबत असावी अशी मागणी मे महिन्यातच केली होती. संबंधित खेळाडूची मागणी बीसीसीआय़ने फेटाळून लावली होती. आता त्याच खेळाडूने या नियमाचं उल्लंघन केल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत अद्याप खेळाडूचं नाव समोर आलेलं नसलं तरी तो रोहित शर्मा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना प्रश्न विचारला आहे. व्यवस्थापकांनी खेळाडू नियमाचे उल्लंघन करत असताना सुब्रमण्यम यांनी आक्षेप का घेतला नाही? त्यांना फक्त संघाच्या सरावाकडे लक्ष देण्यासाठी पाठवलं नव्हतं. आता प्रशासकिय समिती सुब्रमण्यम यांच्याकडून अहवाल मागवू शकते असं म्हटलं जात आहे.

सांगलीच्या 'गज्या'ने मालकाला केलं कर्जातून मुक्त!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2019 10:31 AM IST

ताज्या बातम्या