#DhoniKeepTheGlove : धोनीच्या वादावर भारतीय बोर्डाचे स्पष्टीकरण, ICCकडे केली ही मागणी

#DhoniKeepTheGlove : धोनीच्या वादावर भारतीय बोर्डाचे स्पष्टीकरण, ICCकडे केली ही मागणी

प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआय करणार सविस्तर भाष्य.

  • Share this:

लंडन, 07 जून : भारतानं ICC World Cupमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवत मिशन वर्ल्डकपला सुरुवात केली आहे. दरम्यान या सामन्यात रोहित शर्मानं शतकी खेळी करत सर्वांचे मन जिंकले, पण चर्चा झाली ती धोनीच्या ग्लोव्ह्जची. भारताच्या गोलंदाजी दरम्यान यष्टीरक्षण करताना धोनीच्या ग्लोव्ह्जवर एक खास चिन्ह दिसून आले. हे चिन्ह होते, पैरा स्पेशल फोर्सचे. या चिन्हाला बलिदान चिन्हही म्हटले जाते, क्रिकेटच्या इतिहासात असा प्रकार कधीच घडला नव्हता. यामुळं भारतीय चाहत्यांकडून धोनीचं कौतुक केलं जात आहे. मात्र आता या प्रकरणावरून वादंग सुरू झाला आहे.

दरम्यान, आता या वादावर भारतीय क्रिकेट बोर्डानं स्पष्टीकरण दिले आहे. BCCI प्रशासक विनोद राय यांनी ANIला दिलेल्या प्रतिक्रियेत, “आम्ही यासंदर्भात आयसीसीकडे परवानगी मागितली असून प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर याबाबत सविस्तर माहिती देऊ”, असे त्यांनी सांगितले. शुक्रवारी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी प्रशासक विनोद राय यांना माध्यमांनी या वादावर प्रश्न विचारला. यावर विनोद राय म्हणाले, आम्ही यासंदर्भात आयसीसीकडे परवानगी मागितली आहे. प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर याबाबत सविस्तर भाष्य करु.

आयसीसीनं बीसीसीआयकडे केली हे चिन्हा काढण्याची मागणी

या सगळ्या प्रकरणावर आयसीसीनं आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळाडू जे पेहराव परीधान करताता किंवा जी उपकरण वापरतात त्याबाबत काही नियम आहेत. पेहराव आणि उपकरणांवर राजकीय किंवा धार्मिक गोष्टी असू नयेत, असे आम्हाला वाटते. याबाबत आम्ही बीसीसीआयला विनंती केली आहे.

टेरिटोरियल आर्मीमध्ये आहे धोनी

2011मध्ये महेंद्रसिंह धोनीला भारतीय लष्करातर्फे मानाची लेफ्टनंट कर्नल ही पदवी बहाल करण्यात आली होती. धोनीने यासोबत पॅराट्रूपिंगचंही प्रशिक्षण घेतलं आहे. धोनी हा भारतीय सैनाच्या 106 पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे. तर, 2015 साली प्रशिक्षण घेऊन धोनी पारंगत पॅराट्रूपर बनला होता. म्हणूनच या सामन्यात धोनी हे विशेष बलिदान चिन्ह असलेलं ग्लोव्ह्ज घालून मैदानात उतरला होता.

आयसीसीवर भारतीय चाहते संतापले

आयसीसीनं धोनीला ते ग्लोव्ह्ज काढून टाकण्याची विनंती केल आहे, पण भारतीय चाहत्यांनी आयसीसीलाच फैलावर घेतले आहे. एका चाहत्यानं पाकिस्तानी संघ मैदानात नमाज करतो ते चालतं मग धोनीनं सैन्यासाठी ते चिन्ह वापरलं तर काय, झालं. यावरुनच सध्या सोशल मीडियावर #DhoniKeepTheGlove हे हॅशटॅग ट्रेन्ड होण्यात सुरुवात झाली आहे.

तर, काही चाहत्यांनी आम्ही क्रिकेट पाहणे बंद करु जर धोनीनं ग्लोव्ह्ज वापरणे बंद केले तर. त्यामुळं यावर बीसीसीआय काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वाचा- World Cup : धोनीनं लष्कराला दिला अनोखा सन्मान, 'या' एका कृतीमुळं जिंकलं चाहत्यांच मन

वाचा-धोनीच्या मुद्द्यावरून पाकिस्तानात रणकंदन ; ‘तो क्रिकेट खेळायला गेला आहे, महाभारतासाठी नाही'

वाचा- #DhoniKeepTheGlove : ‘पाकिस्तानच्या खेळाडूंचा नमाज चालतो, मग धोनीचे ग्लोव्ह्ज का नाही’ ; चाहते संतापले

VIDEO : World Cup मध्ये भारताचे सामने फिक्स? पहिल्या विजयानंतर 'या' अफवा

First published: June 7, 2019, 1:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading