World Cup : 'जस्टिस फॉर काश्मिर' पोस्टरवर भडकली BCCI, ICCनं मागितली माफी

भारत-श्रीलंका सामन्यात जस्टिस फॉर काश्मिर असं पोस्टर लावण्यात आलं होतं. वर्ल़्ड कपमध्ये असा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 03:04 PM IST

World Cup : 'जस्टिस फॉर काश्मिर' पोस्टरवर भडकली BCCI, ICCनं मागितली माफी

हेडिंग्ले, 07 जुलै : ICC Cricket World Cup स्पर्धेत भारतानं आपल्या दमदार फॉर्मच्या जोरावर गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे. साखळी स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर एकहाती विजय मिळवला. मात्र भारत आणि श्रीलंका यांच्या सामन्यात एका गोष्टीने वाद निर्माण झाला. सामन्यावेळी हेडिंग्ले स्टेडियमवरून एक विमान गेलं. यावर जस्टिस फॉर काश्मिर असं पोस्टर लावण्यात आलं होतं. वर्ल़्ड कपमध्ये असा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. यावरून बीसीसीआयनं आयसीसीला माफी मागायला लावली आहे.

यामुळं सेमीफायनल आणि फायनलच्या सामन्यात आयसीसीनं या अशा विमानांवर बंदी घातली आहे. दरम्यान आयसीसीचे प्रमुख क्रिस टेटली यांनी यासंदर्भात बीसीसीआयची माफी मागितली आहे. भारताची गोलंदाजी सुरु असताना दोन विमानं प्रकर्षाने उडताना दिसली. यातील एकावर 'काश्मिरला न्याय द्या' असे लिहण्यात आले होते. तर दुसऱ्या विमानावर 'भारतात होणारे मॉब लिंचिंग बंद करा', असे टॅग लावण्यात आले होते. यावरून बीसीसीआय आणि आयसीसी यांच्याच वादाला सुरुवात झाली होती.

आयसीसीनं दिले स्पष्टीकरण

Loading...

आयसीसीने भारत लंकेच्या सामन्यावेळी घड़लेल्या प्रकाराची दखल घेतली आहे. आयसीसीने म्हटलं आहे की याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही. आम्ही पोलिसांची मदत घेऊन असे प्रकार थांबवण्याचं काम करू. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सामन्यात झालेल्या घटनेनंतरही आयसीसीने स्पष्टीकरण दिलं होतं. तेव्हा स्थानिक पोलिसांच्या मदतीनं चौकशी सुरू असून भविष्यात असे प्रकार होणार नाहीत असंही आय़सीसीने म्हटलं होतं.

अफगाणिस्तान सामन्याआधीही घडला होता असाच प्रकार

याआधी अफगाणिस्तान पाकिस्तान सामन्यावेळी असं झालं होतं. त्यावेळी जस्टिस फॉर बलूचिस्तान आणि पाकिस्तानातून बेपत्ता होणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करा असा संदेश देण्यात आला होता.

VIDEO: भाताची लावणी करताना गायलेली ही पारंपरिक गीत तुम्ही ऐकलीत का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 03:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...