लंडन, 30 मे : जगभरातील क्रिकेटप्रेमी ज्या स्पर्धेची गेली पाच वर्ष वाट पाहत होते, त्या विश्वचषक स्पर्धेला आता सुरुवात झाली आहे. दरम्यान पहिला सामना इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात ओव्हलच्या मैदानावर होत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं पुन्हा एकदा 300चा आकडा पार केला. यजमानांनी पहिल्याच सामन्यात साऊथ आफ्रिकेसमोर 312 धावांचे आव्हान ठेवले.
दरम्यान या आव्हानाचा पाठलाग करताना, क्विंटन डी कॉक आणि हाशिम अमला यांनी संथ सुरुवात केली. त्यानंतर जोफ्रा आर्चरच्या बाऊन्सरवर जखमी झाल्यामुळं अमलाला मैदान सोडावे लागले. मात्र आर्चरच्या भेदक माऱ्यापुढं साऊथ आफ्रिकेच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. आपल्या दोन ओव्हरमध्ये आर्चरनं मक्रम आणि कर्णधार ड्यु प्लेसिसला बाद केले. त्यामुळं साऊथ आफ्रिकेचा संघ सध्या चिंतेत आहे.
मात्र, 10व्या ओव्हरमध्ये एक अजब प्रकार घडला. अदिल रशिदच्या 10व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर क्विंटन डिकॉकनं चौकार लगावला. मात्र यावेळी चेंडू स्टम्पला लागला होता. मात्र बेल्स जागेवरुन हलले नाही. त्यामुळं पंचानी डिकॉकला नाबाद घोषित केले. दरम्यान आयपीएलच्या या हंगामात असा प्रकार अनेकवेळा घडला, त्याचाच प्रत्यय विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात आला.
I don't believe it. Rashid deceives de Kock with googly. Flicks his pad, thumps into the bottom of off stump, but the bails go nowhere! The ball runs away for 4 leg byes while everyone looks perplexed. Rashid frustrated. #ENGvSA #CWC19
Loading...— Matt Burns (@RealMattBurns) May 30, 2019
याआधी जोफ्रा आर्चरच्या तिसऱ्या आव्होरमध्ये असा प्रकार घडला जो पाहून क्रिकेट चाहत्यांनाही हादरा बसला. जोफ्रा आर्चरच्या पाचव्या चेंडूवर त्यानं टाकलेला 145 किमी प्रती वेगाचा बाऊंसर अमलाच्या हेल्मेटवर लागला. या चेंडू एवढ्या जोरात लागला की, अमला खाली कोसळला आणि त्यानं हेल्मेट काढला. आर्चरनं अमलाची चौकशीही केली.
मात्र अमलाला झालेली मोठी दुखापत झाली असल्याची शक्यता आहे. कारण ते चेंडू लागल्यानंतर अमलानं लगेचच मैदान सोडले. त्यामुळं साऊथ आफ्रिकेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. याआधी त्यांचा जलद गोलंदाज डेल स्टेनही दुखापतीमुळं स्पर्धेबाहेर आहे. अमला 5 धावांवर रेड हर्ट होऊन मैदानाबाहेर आहे, मात्र तो फलंदाजीकरिता कधीही उतरु शकतो.
वाचा- धक्कादायक ! जोफ्रा आर्चरचा 'तो' बाऊन्सर ठरला साऊथ आफ्रिकन खेळाडूसाठी घातक
वाचा- England vs South Africa : आता एवढचं बाकी होत, साऊथ आफ्रिकेच्या कर्णधारानं चोरली धोनीची रणनीती
VIDEO : ''मैं नरेंद्र दामोदरदास मोदी...'', अशी घेतली पंतप्रधानपदाची शपथ
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा