World Cup : आता जगाला मिळाला दुसरा धोनी, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांचा खळबळजनक दावा

पहिल्या दोन सामन्यांचा अपवाद वगळता धोनीला चांगली फलंदाजी करता आली नाही.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 05:19 PM IST

World Cup : आता जगाला मिळाला दुसरा धोनी, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांचा खळबळजनक दावा

लंडन, 24 जून : ICC Cricket World Cupमध्ये अपराजित अशा भारतीय संघाची चांगलीच चर्चा आहे. मात्र अफगाणिस्तान विरोधात धोनीच्या धिम्या खेळीवरून त्याच्यावर टीका करण्यात आली. मात्र, तो सर्वोत्तम फिनीशर आहे, हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. मात्र आता जगाला दुसरा धोनी मिळाला आहे, असा खळबळजनक दावा ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांनी केला आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लेंगर यांनी धोनी हा जगातला सर्वोत्तम फिनीशर आणि सर्वश्रेष्ठ फलंदाज असला तरी, आता दुसरा धोनी जगाला सापडला आहे, असे सांगत दुसरा धोनी म्हणजे इंग्लंडचा विकेटकीपर फलंदाज जॉस बटलर असल्याचे त्यांनी सांगितले. धोनीनं एकट्याने भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. मात्र पहिल्या दोन सामन्यांचा अपवाद वगळता धोनीला चांगली फलंदाजी करता आली नाही.

अफगाणिस्तानविरुद्द भारताची आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. भारताच्या चार बाद 135 धावा झाल्या होत्या. त्यावेळी 20 ओव्हर बाकी होत्या. त्यानंतर भारताला फक्त 89 धावा करता आल्या. यामध्ये धोनी सर्वात जास्त वेळ मैदानात होता. यात वेगाने धावा न होण्यामागे केदार जाधव आणि धोनी यांची संथ खेळी होती. धोनी फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर धावांसाठी धडपडताना दिसत होता. अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर त्याने 52 चेंडूत फक्त 28 धावा केल्या.

भारताच्या 3 बाद 122 धावा असताना धोनी मैदानात आला होता. त्यानंतर कोहली 31 व्या षटकात बाद झाला. धोनीने पहिल्या 26 चेंडूत एकही चौकार मारला नाही. तसेच वेगवान गोलंदाजाच्या 9 चेंडूत त्याने 16 धावा केल्या. त्याने वेगवान गोलंदाजांनाच तीन चौकार मारले. तर फिरकीपटूंच्या 43 चेंडूत त्याने फक्त 12 धावा केल्या. यात धोनीने जवळपास 30 चेंडू निर्धाव खेळले. अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात धोनीला स्ट्राइक बदलता आला नाही. खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर त्याला फटकेबाजी करता आली नाही. गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावरसुद्धा धोनीने संथ केळी केली होती. यात त्याने एका सामन्यात 59 चेंडूत 37 तर दुसऱ्या सामन्यात 66 चेंडूत 42 धावा केल्या होत्या. या दोन्ही सामन्यात भारताचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले होते. तर दुसऱ्या बाजून पडझड होत असल्यानं धोनीनं संयमाने फलंदाजी केली होती. या दोन्ही सामन्यात भारताचा पराभव झाला होता. त्यामुळं लेंगर यांनी जॉस बटलर हा धोनीची जागा घेणार असल्याचे सांगत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मंगळवारी होणाऱ्या सामन्यात बटलर शुन्यावर बाद होईल असा खुलासाही त्यांनी केला.

वर्ल्ड कपमध्ये बटलरचा बोलबाला

बटलर हा अफ्रिदीनंतरचा दुसरा असा फलंदाज आहे, ज्यानं 50पेक्षा कमी चेंडूत दोन शतक ठोकले आहेत. या वर्ल्ड कपमध्ये बटलरनं 6 सामन्यात दोन मोठ्या खेळी केल्या आहे. बांगलादेश विरोधात 64 धावांची तर, पाकिस्तान विरोधात 103 धावांची खेळी केली.

Loading...

वाचा-वर्ल्ड कपमध्ये पाक संघ सर्वात ढिसाळ, टीम इंडिया जगात भारी !

वाचा-World Cup : भारत-पाक, कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा भिडणार?

वाचा- World Cup : भारतच होणार जग्गजेता, हा घ्या पुरावा!

VIDEO : 'आता माझी सटकली', बैलाने व्यापाऱ्याला लाथ मारून 8 फूट लांब फेकलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 05:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...