World Cup : फाफ डुप्लेसिसची भविष्यवाणी, फायनलमध्ये खेळतील हे दोन संघ!

ICC Cricket World Cup दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिसनं ऑस्ट्रेलियाच्या पराभवाने भारताला आमच्यापेक्षा जास्त आनंद झाला असं म्हटलं.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 05:36 PM IST

World Cup : फाफ डुप्लेसिसची भविष्यवाणी, फायनलमध्ये खेळतील हे दोन संघ!

मँचेस्टर, 07 जुलै : ICC Cricket World Cup शेवटच्या साखळी सामन्यात भारताने लंकेला पराभूत करून गुणतक्त्यात पहिले स्थान पटकावले. तर ऑस्ट्रेलियाला आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने त्यांना दुसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं. यामुळे आता सेमीफायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंड़शी तर ऑस्ट्रेलियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला होता. अखेर आफ्रिकेनं बाजी मारत सामना 10 धावांनी जिंकला. या पराभवाने सेमीफायनलच्या लढतींचे चित्र बदलले.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने सामन्यानंतर सांगितलं की, आम्ही आनंदी असून आमच्यापेक्षा भारतीय संघ अधिक खूश असेल. त्यांना आता सेमीफायनलमध्ये बलाढ्य अशा यजमान इंग्लंडविरुद्ध लढावे लागणार नाही.

फाफ डु प्लेसिस म्हणाला की, मला वाटतं की भारतीय संघ आमच्या विजयामुळे आनंदी असेल. त्यांचा पुढचा सामना न्यूझीलंडशी होईल जो संघ गेल्या तीन सामन्यात पराभूत झाला आहे. याशिवाय फाफ डुप्लेसिसने फायनलला कोण पोहचेल हेसुद्धा सांगितलं आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये 14 जुलैला अंतिम सामना होईल असं फाफ डु प्लेसिस म्हणाला. वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन्ही संघ बलाढ्य आहेत. यामुळे मी या दोन्ही संघापैकी एकाचे समर्थन करेन असंही फाफ डुप्लेसिसनं सांगितलं.

फाफ डुप्लेसिच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. त्याशिवाय रेसी वेन डेर डुसेननं 95 तर क्विंटन डीकॉकनं 52 धावा केल्या. याच्या जोरावर आफ्रिकेनं 325 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाला वॉर्नरच्या दमदार शतकानंतरही 10 धावांनी पराभव पत्करावा लागला.

World Cup : ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू जखमी, संघात घेतलेला 'हा' क्रिकेटर धोकादायक!

Loading...

11 वर्षांनी पुन्हा विराटच्या वाटेत विल्यम्सनचा अडथळा, कोण मारणार बाजी?

VIDEO: भाजपात प्रवेश करण्यासाठी विचार करण्याची गरज नाही- सपना चौधरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 05:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...