News18 Lokmat

AUSvENG Match Highlight : फिंचच्या शतकानंतर असा गडगडला ऑस्ट्रेलियाचा डाव, पाहा VIDEO

ICC Cricket World Cup 2019 : Australia vs England : कर्णधार फिंचचे शतक आणि वॉर्नरच्या अर्धशतकी खेळीनंतरही ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत 285 धावांपर्यंत मजल मारता आली.

News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2019 08:12 PM IST

AUSvENG Match Highlight : फिंचच्या शतकानंतर असा गडगडला ऑस्ट्रेलियाचा डाव, पाहा VIDEO

लॉर्डस, 26 जून : ICC Cricket World Cup इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने फिंचच्या शतकाच्या आणि वॉर्नरच्या अर्धशतकाच्या जोरावर 50 षटकांत 285 धावा केल्या.ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अॅरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी 123 धावांची भागिदारी केली. वॉर्नरला बाद करून मोईन अलीने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. वॉर्नर 53 धावांवर बाद झाला. त्यानंतर फिंचने ख्वाजासोबत अर्धशतकी भागिदारी केली. ख्वाजाला स्टोक्सने 23 धावांवर बाद केलं.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने 116 चेंडूत 100 धावा केल्या. त्यानंतर लगेच शतक साजरं करणाऱ्या फिंचला जोफ्रा आर्चरने ख्रिस वोक्सकडं झेल देण्यास भाग पाडलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. मधल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाले. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक 2 गडी बाद केले. तर आर्चर, वूड, स्टोक्स, मोईन अली यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

दोन्ही संघांसाठी हा सामना मह्त्वाचा आहे, कारण हा सामना म्हणजे अॅशेसची एक झलक असणार आहे. त्यामुळं अ‍ॅशेसप्रमाणे या सामन्याकडे उत्सुकतेने पाहिले जाते. दरम्यान इंग्लंडला आपले आव्हान टिकवण्यासाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. कारण श्रीलंकेकडून 20 धावांनी पराभूत झाल्यामुळे इंग्लंडच्या आव्हानाला धक्का बसला आहे.

इंग्लंड संघानं 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळाल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी सुधारत जागतिक क्रमवारीत जोमाने प्रगती केली. वर्ल्ड कपमध्ये त्यांनी दमदार सुरुवातही केली मात्र हेडिंग्लेच्या खेळपट्टीवर श्रीलंकेनं दिलेल्या 233 धावांचे माफक आव्हान पेलताना इंग्लंडचा संघ 212 धावांवर गारद झाला. त्यामुळं आज ऑस्ट्रेलियाविरोधात सामना जिंकणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण प्रथमच विश्वविजेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या या संघाला यापुढे भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांशी सामना करायचा आहे.

Loading...

तर, दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ चांगल्या जोमात आहे. ऑस्ट्रेलियाने भारताकडून पत्करलेल्या पराभवाव्यतिरिक्त अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघांना नमवून सहा सामन्यांत 10 गुण मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.

वाचा- World Cup Point Table : बांगलादेश ठरणार जायंट किलर, भारतालाही धोका

वाचा- World Cup: 'भारताकडून पराभव झाल्यानंतर आत्महत्या करावी वाटली'

वाचा-अर्जुन तेंडुलकर वर्ल्ड कपमध्ये करतोय इंग्लंडला मदत, 'हे' आहे कारण

बेस्टला अच्छे दिन येणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 08:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...