World Cup : बिग बींचा टोला; वर्ल्ड कप, पाऊस आणि ICCवर अशी घेतली फिरकी

World Cup : बिग बींचा टोला; वर्ल्ड कप, पाऊस आणि ICCवर अशी घेतली फिरकी

आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 18 सामन्यापैकी 4 सामने पावसामुळे रद्द झाले. यावर चाहत्यांनी आयसीसीला ट्रोल केल्यानंतर अमिताभनंही पावसाला टोला लगावला.

  • Share this:

मुंबई, 14 जून : ICC World Cup 2019मध्ये आतापर्यंत एकूण 18 सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते पावसानं कारण आतापर्यंत तब्बल 4 सामने रद्द झाले आहेत. पहिला सामना 7 जून रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रद्द झाला होता. त्यानंतर सोमवारी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामना रद्द झाला, हा सामना केवळ 7.3 ओव्हर खेळला गेला होता. त्यानंतर श्रीलंका-बांगलादेश यांच्यातला सामना रद्द झाला होता. त्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामनाही आता रद्द झाल्यामुळं चाहते आयसीसीवर आता संतापले आहेत. जर पावसामुळं सामने रद्द होणार असतील तर, खेळाडूंनी का खेळावे असा सवाल चाहते विचारत आहेत.

पावसामुळं भारत आणि न्यूझीलंड यांच्या सामना रद्द झाल्यामुळं दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आला. मात्र, यामुळं सर्व संघांना लीग स्टेजमध्ये या गोष्टीचा फटका बसू शकतो. त्यामुळं गुणतालिकेत सध्या भारतीय संघ 3 सामन्यात 5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. तर, न्यूझीलंडचा संघ 7 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. एकीकडे आयसीसीवर चाहते आपला रोष व्यक्त करत असताना, आता जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही आयसीसीचा खरपुस समाचार घेतला आहे. त्यांनी एक मजेशीर ट्विट केले आहे. यात त्यांनी चक्क वर्ल्ड कप भारतात घ्या, असा सल्ला आयसीसीला दिला आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळं भारताला पावसाची जास्त गरज आहे. म्हणून अमिताभ यांनी वर्ल्ड कपच भारतात आणा, असे गमतीशीर ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे. युझरच्या एका ट्विटर ट्विटवर त्यांनी हा गमतीशीर रिप्लाय दिला आहे.

पावसामुळं सतत सामने रद्द असल्यामुळं चाहत्यांनी आयसीसीची शाळा घेतली आहे. यात काही चाहत्यांनी आयसीसीनं ज्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे ते सोडून, धोनीच्या ग्लोव्ह्जवर चर्चा करत आहेत, अशी टीका आयसीसीवर केली आहे.

आयसीसीच्या नियोजनाचा फटका

ICC Cricket World Cup स्पर्धेला 30 मेपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या 18 सामन्यापैकी 4 सामने पावसाने रद्द करावे लागले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रद्द झाला. यामुळे आयसीसीवर टीका केली जात आहे. इतक्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन केले जात असताना हवामानाचा अंदाज नव्हता का? वर्ल्ड कपमध्ये पावसामुळे सामने रद्द होण्याचा विक्रम झाला आहे. याआधी 1992 आणि 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येकी 2 सामने रद्द झाले होते. वर्ल्ड कपची रंगत वाढत असतानाचा पावसाने त्याचा बेरंग केल्याचं चित्र आता दिसत आहे. अनेकांनी वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक सामन्यानंतर एक दिवस राखीव हवा असं म्हटलं आहे. मात्र, आयसीसीने अर्थिकदृष्ट्या मोठ्या स्पर्धेत हे शक्य नसल्याचं स्पष्ट केल आहे.

वाचा- सामना रद्द झाल्याचा गुणतालिकेत विराटसेनेला फटका, न्यूझीलंडचा फायदा

वाचा-World Cup : इंग्लंडमध्ये पंतला टीम इंडियाच्या ड्रेसिंगरूममध्ये प्रवेश बंदी!

वाचा-ICC च्या नियोजनाचा फटका, World Cup चं स्वप्न राहणार अधुरं!

उदयनराजेंचं तुळजाभवानीला साकडं, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First published: June 14, 2019, 3:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading