World Cup : अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी विराटसाठी आनंदाची बातमी

World Cup : अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी विराटसाठी आनंदाची बातमी

मात्र, खेळाडूंच्या दुखापतींची संख्या वाढल्यामुळं कर्णधार विराट कोहलीची चिंता वाढली आहे.

  • Share this:

लंडन, 21 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत सध्या भारतीय संघाची विजयी घौडदौड सुरु आहे. तीन सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. विराटसेना आपला पुढचा सामना शनिवारी अफगाणिस्तान विरोधात खेळणार आहे. मात्र, खेळाडूंच्या दुखापतींची संख्या वाढल्यामुळं कर्णधार विराट कोहलीची चिंता वाढली आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवनला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेऱ पडावे लागले, त्यातच भारताचा जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमारही दुखापतींमुळं काही सामने खेळणार नाही आहेत. यातच भारताचा अष्टपैलू विजय शंकरला दुखापत झाल्याच्या बातम्या होत्या. मात्र, विजय शंकर आता फिट झाला असल्यामुळं शनिवारी अफगाणिस्तान विरुद्ध तो खेळू शकतो.

अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बुमराहनं, "नेटमध्ये सराव करताना कोणताही फलंदाज जखमी व्हावा अशी इच्छा नसते. विजय शंकर जखमी झाला, पण आता तो ठीक आहे". गुरुवारी पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार विजय शंकरला सरावावेळी दुखापत झाली होती. नेटमध्ये फलंदाजी करताना जसप्रीत बुमराहचा यॉर्कर पायाला लागला.

विजय शंकर संघासाठी महत्त्वाचा

विजय शंकर भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू असलेल्या विजयने पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजीत कमाल करून दाखवली होती. त्याने इमाम उल हक आणि सर्फराज अहमदची विकेट घेतली होती. भारताच्या तीन खेळाडूंना आतापर्यंत दुखापतीने ग्रासले आहे. शिखर धवननंतर भुवनेश्वर कुमारला पायाचे स्नायू ताणल्याने मैदान सोडावं लागलं होतं. तो काही सामने खेळू शकणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

ऋषभ पंतला मिळणार का संधी?

शिखर धवन पूर्ण स्पर्धेला मुकला असून त्याच्या जागी ऋषभ पंतला संघात घेण्यात आलं आहे. मात्र अफगाणिस्तान विरोधात तो खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. कारण सलामीसाठी रोहित सोबत केएल राहुल मैदानात उतरेल. तर, चौथ्या क्रमांकावर विजय शंकरला फिट असल्यास संधी मिळेल, कारण विजय शंकरमुळं विराटचा गोलंदाजीचा प्रश्नही सुटू शकतो.

वाचा- World Cup : 'काहीच मदत मिळत नाही', इंग्लंड आणि ICC वर बुमराह भडकला!

वाचा- World Cup 2019 : 400 धावा करणारा वॉर्नर पहिला फलंदाज, केली विराटची बरोबरी!

वाचा- World Cup : कांगारूची पहिल्या स्थानावर उडी, जाणून घ्या भारत कोणत्या नंबरवर?

सानियासाठी 'रावळपिंडी एक्स्प्रेस' उतरली मैदानात, ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2019 08:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading