Wolrd Cup : टीम इंडियाच्या पराभवानंतर शास्त्री गुरुजी बसणार घरी?

Wolrd Cup : टीम इंडियाच्या पराभवानंतर शास्त्री गुरुजी बसणार घरी?

शास्त्री जुलै 2017मध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी विराजमान झाले होते.

  • Share this:

मॅंचेस्टर, 11 जुलै : ICC Cricket World Cupमधून टीम इंडिया बाहेर पडल्यानंतर संघावर आणि व्यवस्थापणेवर चहुबाजूंनी टिका होत आहे. दरम्यान आता भारताचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांची हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरत आहे. काही वर्षांपासून शास्त्री प्रशिक्षक असूनही भारतीय संघानं एकही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. त्याच्या कोचिंगमध्ये भारतीय संघ निराशाजनक कामगिरी करत आहे.

शास्त्री जुलै 2017मध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी विराजमान झाले होते. अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर शास्त्रींची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान त्यांचा करार हा वर्ल्ड कपनंतर संपणार आहे, त्यामुळं बीसीसीआय त्यांची हकालपट्टी करण्याच्या विचारत आहेत. यावर्षी मार्चमध्ये बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांनी याबाबत संकेत दिले होते.

कधी देणार शास्त्रींना नारळ?

वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर शास्त्रींची हकालपट्टी केली जाऊ शकते. कर्णधार विराट कोहली शास्त्रींचे कौतुक करत असले तरी, बीसीसीआयचे अधिकारी मात्र शास्त्रींवर नाराज आहेत.

भारतानं गमावल्या मोठ्या स्पर्धा

शास्त्री गेली 2 वर्षे भारतीय संघाचे प्रशिक्षक आहेत. या काळात भारतीय संघानं कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांक मिळवला होता. मात्र भारताला एकही मोठी स्पर्धा जिंकता आली नाही. वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्येच भारताला पराभव स्विकारावा लागला. तर, गेल्या दोन वर्षात भारतनं इंग्लंड विरोधात पराभव स्विकारावा लागला. त्यामुळं शास्त्री गुरुजी सध्या भारतीय संघासाठी धोक्याची घंटा आहेत.

शास्त्री भारतासाठी अनलकी

ऑगस्ट 2014मध्ये भारतीय संघाच्या संचालकपदी निवड करण्यात आली होती. आपल्या कार्यकाळात 2015मध्ये भारत सेमीफायनलमधून बाहेर पडला होता. याशिवाय 2016मध्ये वर्ल्ड टी-20मध्ये भारत सेमीफायनलमध्ये पोहचला होता. मात्र भारताला चॅम्पियन बनता आले नाही.

वाचा- World Cup: धोनीच बाद होणं लागलं जिव्हारी, चाहत्याचा झाला मृत्यू!

वाचा- WORLD CUP : टीम इंडियाने सामना हरला पण तरीही भारतच चॅम्पियन!वाचा- World Cup : पराभवानंतर धोनीला केन विल्यम्सननं दिली ही ऑफर, पाहा VIDEO

VIDEO: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: July 11, 2019, 5:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading