World Cup : आता हेच शिल्लक राहिलं होतं, नवख्या अफगाणिस्ताननं दिली पाकला ऑफर

अफगाणिस्तानं पाकिस्तानला वर्ल्ड कप 2019च्या वॉर्म अप सामन्यात हरवले होते.

News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2019 01:09 PM IST

World Cup : आता हेच शिल्लक राहिलं होतं, नवख्या अफगाणिस्ताननं दिली पाकला ऑफर

लंडन, 22 जून : ICC Cricket World Cupमध्ये स्पर्धेचा महासंग्रामात आता चुरस वाढली आहे. यात काही संघाचे आव्हान लीग स्टेजमध्ये संपुष्टात आले आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका या बलाढ्या संघाचा तर, अफगाणिस्तान या नवख्या संघाचाही समावेश आहे. पाकिस्तान संघाचीही परिस्थिती काही वेगळी नाही. पाक संघाला आतापर्यंत केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळं त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे.

यातच आता, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (एसीबी)ने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या वाईट खेळीवर टोला लगावला आहे. एसीबीनं अंतरिम संचालक असदुल्लाह खानने, "पाकिस्तान संघाला मदत हवी असेल तर आम्ही तयार आहोत", असा टोला लगावला आहे. तसेच, आफगाणिस्तानचा संघ पाकिस्तान संघापेक्षा चांगला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दोन्ही संघ गुणतालिकेत तळाला आहेत. पाकिस्ताननं 5 सामने खेळले आहेत, यातील केवळ एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर अफगाणिस्तानच्या संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही.

अफगाणिस्तानच्या स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार असदुल्लाहनं, "यावेळी अफगाणिस्तानचा संघ चांगला आहे. फक्त आम्हाला चांगली कोचिंग, पध्दत आणि सोयी सुविधांची गरज आहे". अफगाणिस्तानं पाकिस्तानला वर्ल्ड कप 2019च्या वॉर्म अप सामन्यात हरवले होते. यो दोन्ही संघात 29 जून रोजी सामना होणार आहे.

आज अफगाणिस्तान विजयीरथावर असलेल्या भारताविरुद्ध खेळणार आहे. भारतानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारत-अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. यात एक सामना भारतानं जिंकला तर, एक सामना टाय झाला होता. या दोन्ही संघात 2014मध्ये आशियाई चषक स्पर्धेत पहिला सामना झाला होता.

वाचा- भारताच्या विजयात पावसाचा खोडा? काय आहे हवामानाचा अंदाज

Loading...

वाचा- पंतने केला खुलासा, World Cup संघात नाव नाही हे समजल्यावर काय केलं

वाचा- विराटचा डोळा सचिन आणि लाराच्या विश्वविक्रमावर; अफगाणविरुद्ध आहे संधी!

पाकिस्तानी कर्णधाराचा चाहत्यांकडून अपमान, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 01:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...