BAN vs AFG : अफगाणिस्ताननं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय

BAN vs AFG : अफगाणिस्ताननं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय

अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात आले असले तरी, बांगलादेशला हा सामना जिंकाव लागणार आहे.

  • Share this:

हॅम्पशायर, 24 जून : ICC Cricket world Cupमध्ये आज अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लढत होत आहे. यात अफगाणिस्ताननं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान अफगाणिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर गेला असला तरी, बांगलादेशला कडवे आव्हान देऊ शकतात. तर, बांगलादेश गुणतक्त्यात सहाव्या स्थानावर आहे. बांगालदेशचे उर्वरित सामने अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध आहेत. यात एक जरी पराभव झाला तरी त्यांना सेमिफायनल गाठता येणार नाही. उरलेले तीनही सामने जिंकल्यास त्यांना संधी मिळू शकते. मात्र, धावगती कमी असल्याने त्यांना 'जर.. तर'च्या खेळावर अवलंबून रहावं लागेल. त्यामुळेच अफगाणिस्तानविरुद्ध असलेला सामना त्यांचासाठी महत्त्वाचा असणार आहे.

अफगाणिस्तानने भारताविरुद्ध अखेरच्या षटकापर्यंत झुंज दिली. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असलं तरी भारताविरुद्धच्या कामिगिरीने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. सोमवारी त्यांची लढत बांगलादेशसोबत होणार आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नैबनं सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत वेगळ्याच अंदाजात बांगलादेशला इशारा दिला आहे.

आमचे आव्हान संपुष्टात आलं आहे आता तुमचेही आव्हान संपेल असं सांगत त्यांने सामना आम्ही जिंकू असा विश्वास असल्याचं म्हटलं आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीनने बांगलादेशला इशारा देण्यासाठी हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डुबेंगे या ओळींचा वापर केला. अफगाणिस्तानचे पुढचे सामने पाकिस्तान, वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध आहेत. बांगलादेशने सहापैकी दोन सामने जिंकले तर तीन मध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

VIDEO : 'आता माझी सटकली', बैलाने व्यापाऱ्याला लाथ मारून 8 फूट लांब फेकलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 03:13 PM IST

ताज्या बातम्या