World Cup : अफगाणिस्तानला मोठा झटका ! मोहम्मद शेहजाद वर्ल्ड कप बाहेर

शेहजाद हा फलंदाज संघाला आक्रमक सुरुवात देण्यासाठी नावाजला जातो.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 07:21 PM IST

World Cup : अफगाणिस्तानला मोठा झटका ! मोहम्मद शेहजाद वर्ल्ड कप बाहेर

लंडन, 07 जून : यंदाच्या ICC World Cupमध्ये अफगाणिस्तानचा संघाकडून सर्वांना जास्त अपेक्षा आहेत. यात सलामीवीर मोहम्मद शेहजाद याच्या फलंदाजांनी सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा अफगाणिस्तानचा संघ पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणार आहे. दरम्यान आता याच वर्ल्ड कपमध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे. संघाचा यष्टीरक्षक आणि स्फोटक फलंदाज अहमद शेहजाद याला दुखापतीमुळं माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी अक्रम अली खानला संघात जागा देण्यात आली आहे.

शेहजाद हा फलंदाज संघाला आक्रमक सुरुवात देण्यासाठी नावाजला जातो. मात्र यंदाच्या विश्वचषकात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या विरोधात त्याची बॅट तळपली नाही, ऑस्ट्रेलियाच्या विरोधात त्याला आपलं खातंही खोलले नव्हते. तर, श्रीलंकेच्या विरोधात त्यानं केवळ 7 धावा केल्या होत्या. मात्र ता गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे.

अहमद शेहजादने आतापर्यंत 84 एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तर अक्रम अली खानकडे फक्त दोन सामन्यांचा अनुभव आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची घोषणा करण्यात आली आहे.Loading...

धोनीचा जबरा फॅन आहे शेहजाद

अफगाणिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद शेहजाद धोनीचा सर्वात मोठा फॅन आहे. आपल्या एका मुलाखतीदरम्यान त्यानं स्वत: आपण धोनीचा फॅन असल्याचे जाहीर केले होते. त्याला धोनीप्रमाणे आक्रमक फलंदाजी आणि यष्टीरक्षण करायल आवडते असेही त्यानं स्पष्ट केले होते.

वाचा- World Cup : धोनीनं लष्कराला दिला अनोखा सन्मान, 'या' एका कृतीमुळं जिंकलं चाहत्यांच मन

वाचा-धोनीच्या मुद्द्यावरून पाकिस्तानात रणकंदन ; ‘तो क्रिकेट खेळायला गेला आहे, महाभारतासाठी नाही'

वाचा- #DhoniKeepTheGlove : ‘पाकिस्तानच्या खेळाडूंचा नमाज चालतो, मग धोनीचे ग्लोव्ह्ज का नाही’ ; चाहते संतापले


SPECIAL REPORT : धोनीच्या ग्लोव्ह्जवरून का पेटला वाद, आयसीसीचा काय आहे आक्षेप?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 04:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...