धोनीसंदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी, निवृत्तीबाबत झाला 'हा' निर्णय

वर्ल्ड कपमधून भारतीय संघ बाहेर पडल्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2019 01:40 PM IST

धोनीसंदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी, निवृत्तीबाबत झाला 'हा' निर्णय

मुंबई, 14 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये सेमीफायनलमधून भारतीय संघ बाहेर पडल्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र यासंदर्भात केवळ क्रिकेटपटू नाही तर अन्य क्षेत्रातील व्यक्तींनी आपली मते व्यक्त केली आहेत. काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांनी धोनीच्या निवृत्तीसंदर्भात ट्विटवरून त्यांचे मत मांडले होते. यातच धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आयपीएल खेळणार की नाही, असा सवाल चाहते विचारत आहेत.

दरम्यान आता धोनीच्या निवृत्तीसंदर्भात धोनीचा आयपीएलचा संघ चेन्नई सुपरकिंग्ज यांनी मोठा खुलासा केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनी पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार आहे. 38 वर्षीय धोनी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत असला तरी, 2020च्या आयपीएलमध्ये खेळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरोधात धोनीनं केलेल्या धिम्या फलंदाजीवर अनेकांनी टिका केली होती. मात्र, सेमीफायनलच्या सामन्यात धोनीनं अर्धशतकी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. सेमीफायनलमध्ये जडेजासमवेत धोनीनं 116 धावांची भागिदारी केली, मात्र त्याला संघासाठी विजय मिळवता आला नाही. त्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले.

लता मंगेशकर, जावेद अख्तर यांनी धोनीकडे केली विनंती

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी काही दिवसांपूर्वी, नमस्कार एम एस धोनीजी, तुम्ही क्रिकेटमधून निवृत होणार आहात असं मी मागच्या काही दिवसांपासून ऐकत आहे. कृपया तुम्ही असा विचार करू नका. देशाला तुमच्या खेळाची गरज आहे आणि मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही निवत्तीचा विचारही मनात आणू नका’, असे ट्वीट केले होते. लतादिदींच्या पाठोपाठ जावेद अख्तर यांनी देखील ट्विटकरून धोनीच्या निवृत्तीसंदर्भात स्वत:चे मत मांडले आहे. मधल्या फळीतील फलंदाज, विकेटकीपर म्हणून धोनीवर विश्वास ठेऊ शकतो. धोनीवर अवलंबून राहता येते. विराटने देखील मान्य केली आहे की मैदानात रणनिती ठरवताना धोनीचा उपयोग होतो. आपण सर्व जण पाहतोय की धोनीमध्ये अजून क्षमता आहे. असे असताना त्याच्या निवृत्तीबद्दल चर्चा का केली जात आहे?, असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले आहे.

Loading...

VIDEO: ब्रह्मपुत्रा नदीचं रौद्ररूप, पाण्यातल्या बोटीसारखी वाहून गेली शाळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2019 01:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...