Elec-widget

World Cup : तब्बल सातवेळा कागदावर कमकुवत वाटणारे संघ ठरले जायंट किलर !

आयसीसी रँकिंगमध्ये सातव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशन तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या साऊथ आफ्रिका संघाचे कंबरडे मोडले.

  • Share this:

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशनं सर्वात मोठा धक्का दिला आहे. त्यांनी रविवारी झालेल्या सामन्यात साऊथ आफ्रिका संघाला 21 धावांनी नमवले. आयसीसी रँकिंगमध्ये सातव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशन तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या साऊथ आफ्रिका संघाचे कंबरडे मोडले. पण हे असे पहिल्यांदा घडलेले नाही, याआधी सातवेळा कमकुवत वाटणाऱ्या संघांनी बलाढ्य संघांना लोळवले आहे

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशनं सर्वात मोठा धक्का दिला आहे. त्यांनी रविवारी झालेल्या सामन्यात साऊथ आफ्रिका संघाला 21 धावांनी नमवले. आयसीसी रँकिंगमध्ये सातव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशन तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या साऊथ आफ्रिका संघाचे कंबरडे मोडले. पण हे असे पहिल्यांदा घडलेले नाही, याआधी सातवेळा कमकुवत वाटणाऱ्या संघांनी बलाढ्य संघांना लोळवले आहे.

भारतीय क्रिकेटप्रेमी 1983चा विश्वचषक कधीच विसरू शकणार नाहीत. कागदावर कमकुवत वाटणाऱ्या कपिल देव यांच्या शिलेदारांनी 183वर ऑल आऊट होऊनही शक्तिशाली वेस्ट इंडिज संघाला 43 धावांनी नमवले. आणि जायंट किलर बनत चॅम्पियनचा ताज मिळवला.

1983च्या वर्ल्ड कपमध्ये जिम्बाब्वे संघाने ऑस्ट्रेलियाला 13 धावांनी नमवत खळबळ माजवली होती. पहिल्यांदा फलंदाजी करताना जिम्बाब्वेने 239 धावा केल्या. मात्र ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाला हे आव्हान पार करता आले नाही.

Loading...

भारताने यजमानपद भूषविलेल्या 1996च्या वर्ल्ड कपमध्येही असाच प्रकार दिसून आला, केनियासारख्या नवख्या संघाने बलाढ्य वेस्ट इंडिज संघाला पराभूत केले होते. 167 धावांचा पाठलाग करताना त्यांनी वेस्ट इंडिज संघाला कठीण गेले, परिणामी 93 धावतच सर्व संघ बाद झाला आणि केनिया संघानं हा सामना जिंकला.

 2003च्या वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा केनिया संघाने आपले वर्चस्व दाखवले. यावेळी केनिया संघाने श्रीलंकेची शिकार केली. केनियाने दिलेल्या 211 धावांचे आव्हान श्रीलंकेला पेलावले, परिणामी केनियाने तब्बल 53 धावांनी हा सामना जिंकला.

2006च्या वर्ल्ड कपमध्येही बांगलादेश संघाने आपली ताकद दाखवली तीही बलाढ्य भारतीय संघसमोर, द्रविड पासून सचिन पर्यंत सर्वाना थक्क करणारा हा निकाल होता. बांगलादेशने भारतीय संघाला 5 विकेटने नमवत थेट वर्ल्ड कपच्या बाहेर केले होते.

2006च्या वर्ल्ड कपमध्येही बांगलादेश संघाने आपली ताकद दाखवली तीही बलाढ्य भारतीय संघसमोर, द्रविडपासून सचिनपर्यंत सर्वांना थक्क करणारा हा निकाल होता. बांगलादेशने भारतीय संघाला 5 विकेटने नमवत थेट वर्ल्ड कपच्या बाहेर केले होते.

2007मध्ये ज्या दिवशी बांगलादेशच्या संघाने भारतीय संघाला धूळ चारली त्याच दिवशी आणखी एक मोठी उलथापालथ झाली. आयर्लंडच्या संघाने पाकिस्तानच्या संघाला 132 धवांवर ढेर केले. हा सामना बॉब वूल्मर या प्रशिक्षकच्या रहस्यमय मृत्यूसाठी सुद्धा ओळखली जाते.

2011 च्या वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा आयर्लंडसंघाने आपली जादू दाखवली. आयर्लंडने इंग्लंडसारख्या शक्तिशाली संघाला 3 विकेटने धूळ चारली होती. पहिल्यादा फलंदाजी करताना त्इंग्लंडने 327 धावांचा डोंगर उभारला होता. हे आव्हान आयर्लंड पार करू करू शकणार नाही असे वाटत होते कारण 111 वर पाच बाद अशी स्थिती असताना केविन ओ'ब्रायन याने 113 धावांची शतकी खेळी केली. या खेळीच्या जोरावर आयर्लंडन इंग्लंडला धूळ चारली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 08:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...