विराटचं नाणं खणखणीत, जे 20 वर्षांत जमलं नाही ते चहलनं केलं

विराटचं नाणं खणखणीत, जे 20 वर्षांत जमलं नाही ते चहलनं केलं

ICC Cricket World Cup 2019 : INDvSA प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या निम्म्या संघाला भारतीय गोलंदाजांनी 100 धावांच्या आत तंबूत धाडलं.

  • Share this:

साउथॅम्पटन, 05 जून : भारताची वर्ल्ड कपमधील पहिली लढत दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. साउथॅम्पटन इथल्या रोज बाउल क्रिकेट ग्राउंडवर हा सामना होत असून आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आफ्रिकेला हा निर्णय महागात पडला. भारताच्या वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही गोलंदाजांनी आफ्रिकेला दणका दिला. पहिल्या दहा षटकांत जसप्रीत बुमराहने तर 20 व्या षटकात युझवेंद्र चहलनं आफ्रिकेच्या फलंदाजांना जाळ्यात अडकवलं.

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या आफ्रिकेच्या सलामीवीरांना बुमराहनं आपल्या तीन षटकांत माघारी धाडलं. हाशिम अमला 6 धावांवर बाद झाला. तर, क्विंटन डीकॉक 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी करणाऱी जोडी युझवेंद्र चहलनं फोडली. त्यानं पहिल्यांदा डु प्लेसी आणि नंतर रॉसी वान डेर डुसेनला बाद केलं.

भारताने या सामन्यात दोन फिरकीपटूंना संघात घेतलं आहे. पण गेल्या 20 वर्षांत या मैदानावर फिरकीपटूंची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. इंग्लंडमधील मैदानांवर फिरकीपटूंपेक्षा वेगवान गोलंदाजांनी जास्त यश मिळवलं आहे. त्या तुलने फिरकी गोलंदाजीला इथलं वातावरण अनुकूल नाही. या परिस्थितीतही भारताचे फिरकीपटू युझवेंद्र चहलने 2 तर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने 1 विकेट घेतली.

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज वान डेरर डुसेनला एकदिवसीय क्रिकेटमध्ये बाद करणारा युझवेंद्र चहल हा दुसरा फिरकीपटू आहे. त्याने या विकेटच्या आधी लेग स्पिनर्सविरुद्ध 103 चेंडूत 65 धावा केल्या आहेत.

भारताविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका पराभूत झाल्यास पहिल्यांदा त्यांना सुरुवातीच्या तीन सामन्यात पराभव होईल. दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदाच अशा परिस्थितीला सामोरं जावं लागेल. आजच्या सामन्यावेळी वातावरण चांगले राहिल. सुरुवातीच्या षटकांत वेगवान गोलंदाजांसाठी पोषक वातावरण असेल मात्र, नंतर फिरकीपटू आणि फलंदाजांना अनुकूल स्थिती असेल.

इंग्लंडच्या या मैदानावर पहिल्यांदाच वर्ल्ड कप स्पर्धा होत आहे. फलंदाजांसाठी ही खेळपट्टी नंदनवन असल्याचं मानलं जातं. याआधी झालेल्या एकदिवसीय सामन्यात 743 धावांचा पाऊस पडला होता.

दक्षिण आफ्रिकेला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यांचे तीन खेळाडू जखमी आहेत. यामध्ये हाशिम आमला, लुंगी एनगिडी यांचा समावेश आहे. तर डेल स्टेन स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यांच्यासमोर भारताच्या तंदुरुस्त खेळाडूंचे आव्हान असणार आहे.

भारताकडे नंबर एकचा गोलंदाज जसप्रीत बुमराह, कुलदीप चहल, भुवनेश्वर आणि मोहम्मद शमी यांच्या सारखे गोलंजदाज आहेत. तर फलंदाजीत शिखर धवन, रोहित शर्मा, कोहली, धोनी आहेत.

SPECIAL REPORT: वर्ल्ड कपदरम्यान चॅम्पियन धोनीच्या जिवाला धोका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 05:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading