पाँटिंग होणार भारतीय संघाचा प्रशिक्षक? गांगुलीने दिलं हे उत्तर

पाँटिंग होणार भारतीय संघाचा प्रशिक्षक? गांगुलीने दिलं हे उत्तर

वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्रींचा करार संपणार आहे. त्यानंतर नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 02 मे : आयपीएलच्या गुणतक्त्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्लीने सहा वर्षांनंतर प्लेऑफमध्ये स्थान पटकावलं आहे. प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि सल्लागार सौरभ गांगुली यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीनं यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. आगामी वर्ल्ड कपनंतर रिकी पाँटिंग भारताचा प्रशिक्षक होणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रिकी पाँटिंग भारतीय संघाचा प्रशिक्षक होऊ शकतो का? या प्रश्नावर भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली म्हणाला की, भारताच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी घेतल्यास किमान सात ते आठ महिने त्याला घरापासून दूर राहावं लागेल. पाँटिंग यासाठी तयार होईल की नाही हे सांगता येत नाही.

भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी पाँटिंग नक्कीच दावेदार ठरू शकतो. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे याबाबत कोणतीही शंका नाही असंही गांगुलीने म्हटलं.

भारतीय संघ वर्ल्डकपची तयारी सुरू असताना प्रशिक्षक रवि शास्त्रींची मुदत वाढणार का नाही यावर चर्चा सुरू झाली आहे. रवि शास्त्रींची नियुक्ती जुलै 2017 मध्ये करण्यात आली होती. वर्ल्डकपनंतर त्यांचा करार संपणार आहे. याबाबत क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय लवकरच यासाठी जाहिरात देण्याची शक्यता आहे.

वर्ल्डकपनंतर रवि शास्त्रींसोबतचा करार संपणार असून त्यांच्या जागी नवीन प्रशिक्षक नेमण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मात्र, शास्त्रींना वर्ल्डकपनंतर होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत मुदतवाढ मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

सध्या भारतीय संघाचे चार प्रशिक्षक आहेत. संजय बांगर, भरत अरुण, एस. श्रीधर आणि रवि शास्त्री हे देखील प्रशिक्षक निवडीच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. यांच्या पैकी कोणालाही प्रशिक्षकपदासाठी अर्ज करावा लागणार नाही.

SPECIAL REPORT : 'या वयात पाण्यासाठी 2-3 किलोमिटर चालावं लागतंय, लेकरांना कसं मोठं करायचं?'

First published: May 2, 2019, 9:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading