सचिन की विराट? 'या' माजी क्रिकेटपटूने सांगितलं कोण सर्वोत्कृष्ट

सचिन की विराट? 'या' माजी क्रिकेटपटूने सांगितलं कोण सर्वोत्कृष्ट

30 जूनपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

  • Share this:

लंडन, 10 मे : क्रिकेट जगतात सध्या खेळत असलेल्या खेळाडूंची इतिहासातील महान खेळाडूंसोबत होणारी तुलना नवी नाही. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि रनमशिन विराट कोहली यांचीही तुलना केली जाते. आगामी वर्ल्ड कप स्पर्धा 30 मे पासून सुरु होत आहे. या स्पर्धेत इंग्लंडने ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून माजी कर्णधार अँड्र्यू फ्लिंटॉफची निवड केली आहे.

सचिन आणि विराट यांच्यातील महान फलंदाज कोण ? असा प्रश्न अँड्र्यू फ्लिंटॉफला विचारण्यात आला. तेव्हा फ्लिंटॉफने सांगितले की, विराट सर्वोत्कृष्ठ खेळाडू आहे. सचिनपेक्षाही चांगला खेळाडू आहे. मी कधीच कोणाचीही सचिनसोबत तुलना होईल असा विचार केला नव्हता. मात्र, विराटने तसा खेळ केला आहे.

सचिनने भारतासाठी 100 शतके आणि 33 हजार धावा केल्या. तर विराटने 66 शतकांसह 24 हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विराट अजूनही क्रिकेट खेळत आहे. त्याची फलंदाजी पाहून सचिनच्या खेळाशी मिळती जुळता खेळ वाटतो. मला त्याला खेळताना बघायला आवडते. वर्ल्ड कपमध्ये त्याला खेळताना लोकांना पहायचे आहे असेही फ्लिंटॉफ म्हणाला.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला वर्ल्ड कपचा दावेदार मानलं जात आहे. जगातील अव्वल संघ असलेल्या इंग्लंडशिवाय भारतही वर्ल्ड कपचा दावेदार आहे. भारतीय संघ संतुलित असल्याचंही अनेक दिग्गज खेळाडूंनी म्हटलं आहे.

वाचा- आयपीएलमुळं भंगलं 'या' खेळाडूचं वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न, पण मुंबई इंडियन्स करणार मदत

वाचा- IPL 2019 : 'हे' चार भारतीय खेळाडू ठरवतील फायनलचं भवितव्य

वाचा- CSK vs DC : रिषभ पंतला रोखण्यासाठी ‘हा’ आहे धोनीचा मास्टरप्लॅन

VIDEO: ...तर अरविंद केजरीवाल राजकारण सोडणार का? गौतम 'गंभीर' आव्हान

First published: May 10, 2019, 8:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading