केन विल्यम्सनचे शतक, वेस्ट इंडिजला विजयासाठी 292 धावांचे आव्हान

केन विल्यम्सनचे शतक, वेस्ट इंडिजला विजयासाठी 292 धावांचे आव्हान

ICC Cricket World Cup 2019 : वेस्ट इंडिजच्या शेल्डन कॉट्रेलनं पहिल्याच षटकात न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांना बाद केलं.

  • Share this:

मँचेस्टर, 22 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने न्यूझीलंडविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनच्या शतकाच्या आणि रॉस टेलरच्या अर्धशतकाच्या जोरावर 50 षटकांत 8 बाद 291 धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या शेल्डन कॉट्रेलनं पहिल्याच षटकात न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांना बाद केलं. त्याने कुलीन मुनरो आणि मार्टिन गुप्टिलला बाद केलं. मात्र, त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांनी 160 धावांची भागिदारी केली. गेलने या दोघांची जोडी फोडली. रॉस टेलरला 69 धावांवर बाद केलं. त्यानंतर टॉम लॅथमला कॉट्रेलनं बाद केलं. दरम्यान कर्णधार केन विल्यम्सनने वर्ल्ड कपमधील दुसरं शतक साजरं केलं. त्यालाही कॉट्रेलनं बाद केलं. शाय होपच्या हाती झेल देऊन तो बाद झाला. केन विल्यम्सनने 154 चेंडूत 148 धावा केल्या. यात त्याने 15 चौकार आणि एक षटकार मारला. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने वेस्ट इंडिजसमोर 292 धावांचे आव्हान ठेवलं.

वेस्ट इंडिजने या सामन्यासाठी संघात तीन बदल केले आहेत. ड्वेन ब्राव्होला विश्रांती दिली असून त्याच्या जागी अॅश्ले नर्सला संधी दिली आहे. तर शेनन गॅब्रिएलच्या जागी केमर रोच आणि रसेलच्या जागी कार्लोस ब्रॅथवेटला संघात घेतलं आहे. न्यूझीलंडने मात्र संघात बदल केलेला नाही.

वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजची आतापर्यंतची कामगिरी खराब असून न्यूझीलंड सेमीफायनलला पोहोचण्यापासून एक पाऊल दूर आहे. वेस्ट इंडिजने पाकिस्तान वगळता इतर सामन्यात पराभव पत्करला आहे. गुणतक्त्यात ते सातव्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडचा संघ आतापर्यंत अपराजित आहे. वेस्ट इंडिजवर विजय मिळवून सेमिफायनलमध्ये स्थान पक्कं करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

वाचा- पंतने केला खुलासा, World Cup संघात नाव नाही हे समजल्यावर काय केलं

पाकिस्तानी कर्णधाराचा चाहत्यांकडून अपमान, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 10:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading