World Cup : गेलचा 'धोनी' अवतार! चाहत्यांसह दिग्गजही झाले अवाक्

वेस्ट इंडिजविरुद्ध चार निर्णय डीआरएसनं बदलले तर एका पंचांच्या एका चुकीचा ख्रिस गेलला फटका बसला.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 10:28 AM IST

World Cup : गेलचा 'धोनी' अवतार! चाहत्यांसह दिग्गजही झाले अवाक्

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजने डीआरएस मध्ये चारही वेळा यश मिळवलं. चारवेळा डीआरएस घेतला तेव्हा प्रत्येकवेळी पंच चुकीचे ठरले.

वेस्ट इंडिजचा उपकर्णधार आणि तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलने 2 वेळा तर कर्णधार जेसन होल्डरने दोन वेळा डीआरएस रिव्ह्यू घेतला.

 विडीडजच्या डावावेळी तिसऱ्या षटकात मिशेल स्टार्कने गेलला दोन वेळा बाद केलं. पण डीआरएसचा निर्णय दोन्हीवेळा गेलच्या बाजूने आला. तिसऱ्यावेळी गेलनं डीआरएस घेतला पण तो पायचित झाला. यावरूनही वाद निर्माण झाला. कारण त्याच्याआधीचा बॉल पंचांनी नो बॉल दिला नाही.

Loading...

 गेल नंतर कर्णधार जेसन होल्डरने 36 व्या आणि 38 व्या षटकात अॅडम झाम्पाच्या गोलंदाजीवर डीआरएस घेतला. त्यावेळी पंचांनी पायचित दिलं होतं पण डीआऱएसमुळं पंचांना निर्णय बदलावा लागला.

धोनीला डीआरएस मास्टर मानतात. डीआरएसला धोनी रिव्ह्यू सिस्टिम असंही चाहते म्हणतात. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेल आणि जेसन होल्डरने ज्या पद्धतीने डीआरएस योग्य वेळी घेतले त्यामुळे त्यांच्यात धोनी अवतरला होता म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 10:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...